Govardhan Asrani Dies Saam tv
मनोरंजन बातम्या

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

Govardhan Asrani last post viral : प्रसिद्ध अभिनेते असरानी यांनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांची मृत्यूआधीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

Govardhan Asrani passes away : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असरानी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ऐन दिवाळीत सोमवारी असरानी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर असरानी यांची मृत्यूआधीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.

असरानी यांनी ३५० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. असरानी यांनी मुंबईतील रुग्णालयात आज सोमवारी दुपारी ३ वाजता अखेरचा श्वास घेतला. असरानींच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुजोरा दिला आहे.

असरानी यांची शोले सिनेमातील जेलरची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या विविध सिनेमातील अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी भूल भुलैया,धमाल, बंटी और बबली २, आर...राजकुमार, ऑल द बेस्ट, वेलकम यांसारख्या अनेक सिनेमात त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. असरानी यांनी मृत्यूआधी इस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. असरानी यांची दिवाळीची पोस्ट आता व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT