Bollywood First Kiss: प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या किसिंग कॉट्रोव्हरसीमुळे सध्या बॉलिवूड कलाकारांच्या किसिंग कॉट्रोव्हरसीचे किस्से बाहेर पडत आहे. पण तुम्हला माहिती आहे का चित्रपटात किसिंग सीन टाकण्याची सुरुवात कधी पासून झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात इंटिमेट आणि किसिंग सीन्स दाखवण्यात आले आहेत. अनेक दृश्यांबाबत वादही झाला. पण आजकाल चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये किसिंग आणि इंटिमेट सीन्स खूप सामान्य झाले आहेत. तथापि, लोकांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच किसिंग सीन दाखवल्या निर्माण झालेल्या गोंधळाची कल्पना करण्यास बराच वेळ लागला.
पहिला किसिंग सीन कोणत्या अभिनेत्रीने केले होते?
१९३३ साली म्हणजे सुमारे ९१ वर्षांपूर्वी, पहिला किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता आणि तो पडद्यावर दाखवल्यानंतर खूप गोंधळ उडाला होता. १९३३ च्या कर्मा चित्रपटात देविका राणीने हिमांसू राय सोबत एक मोठा लिप-लॉक सीन दिला होता. दोघेही खऱ्या आयुष्यातही कपल होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या किश्वर देसाई यांनी २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द लॉन्जेस्ट किस: द लाईफ अँड टाइम्स ऑफ देविका राणी' या पुस्तकात याचा सविस्तर उल्लेख केला आहे.
त्यांनी लिहिले की देविका आणि हिमांशू यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्यांच्यातील प्रेमसंबंध खऱ्या आयुष्यात आणि पडद्यावरही दिसून येत होते. पुढे लिहीतात १९२०-३० मध्ये किसिंग सीन ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यावेळी, देश ब्रिटिश राजवटीखाली होता आणि कर्मा हा चित्रपट ब्रिटिश चित्रपट निर्माते जेएल फ्रीर हंट यांनी दिग्दर्शित केला होता.
चित्रपटाबद्दल गोंधळ उडाला होता
चित्रपटातील किसिंग सीनवरून भारतात गोंधळ उडाला आणि चित्रपटावर बंदीही घालण्यात आली. तथापि, कर्मा परदेशी आणि युरोपीय देशात खूप लोकप्रिय ठरला. चित्रपटात ४ मिनिटांचा किसिंग सीन होता पण त्याच्या लांबीबद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे मत आहे. एकंदरीत, वाद आणि इतक्या बातम्या असूनही हा चित्रपट हिट झाला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.