Sohana Saba: प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर

Sohana Saba Arrested: अभिनेत्री मेहर अफरोज शॉननंतर आता बांगलादेशमध्ये आणखी एका अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले असून गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात तिला घेऊन जाण्यात आले आहे.
Bangladeshi Actress Sohana Saba Arrested
Bangladeshi Actress Sohana Saba ArrestedGoogle
Published On

Sohana Saba Arrested: भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये सध्या अशांतता आहे. देशात अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिच्या अटकेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला चौकशीसाठी नेण्यात आले आहे. अभिनेत्री सोहाना सबालाही ताब्यात घेण्यात आले आहे आणि चौकशीसाठी गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.

ढाका महानगर पोलिस उपायुक्त मुहम्मद विल्बर रहमान यांनी गुरुवारी रात्री पुष्टी केली की, अभिनेत्री सोहाना सबाला चौकशीसाठी नेण्यात आले आहे. यापूर्वी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मेहर अफरोज शॉन यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. मेहरला ढाका येथील धनमोंडी परिसरातील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

Bangladeshi Actress Sohana Saba Arrested
Sonu Sood: फसवणूक प्रकरणात जारी केलेल्या अटक वॉरंटवर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अभिनेत्रीची चौकशी सुरू आहे.

गुप्तहेर शाखेचे प्रमुख रेजाउल करीम मलिक म्हणाले की, मेहरला राज्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तिला चौकशीसाठी मिंटो रोडवरील गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. जिथे मेहर अफरोजला राज्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी, सोहाना सबाला कोणत्या गुन्ह्यासाठी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे हे अद्याप उघड झालेले नाही. दोन्ही अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरू आहे.

Bangladeshi Actress Sohana Saba Arrested
Priyanka Chopra :'तू मान मेरी जान'; प्रियांका-निकचा हटके परफॉर्मन्स बघून चाहते फिदा, Video व्हायरल

यावेळी बांगलादेशात, मेहर अफरोज शॉनवर पहिली कारवाई करण्यात आली. आता, सोहाना सबालाही घेरण्यात आले आहे. मेहरला केवळ ताब्यात घेण्यात आले नाही तर संतप्त जमावाने गावातील तिच्या घरालाही आगही लावली. जमालपूर सदर उपजिल्ह्यातील नरुंडी रेल्वे स्थानकाजवळ असलेले त्याचे वडील मोहम्मद अली यांचे घर आगीत जाळून गेले आहे.

सोहाना साबा कोण आहे?

सोहाना सबा ही बांगलादेशच्या चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लोकांची मने जिंकली आहेत. सोहाना सबा "आयना" आणि "ब्रिहोनोला" सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. या भूमिकांनंतर ती बरीच चर्चेत राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com