Priyanka Chopra :'तू मान मेरी जान'; प्रियांका-निकचा हटके परफॉर्मन्स बघून चाहते फिदा, Video व्हायरल

Priyanka Chopra Brothers Weeding: प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सिद्धार्थ आणि नीलमचा संगीत सोहळा गुरुवारी होता, ज्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Priyanka Chopra and Nick Jonas
Priyanka Chopra and Nick Jonas google
Published On

Priyanka Chopra Brothers Weeding: प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हळदी आणि मेहंदीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहेत. काल सिद्धार्थ आणि त्याची होणारी बायको नीलम उपाध्याय यांचा संगीत कार्यक्रम होता आणि या खास प्रसंगी प्रियांका चोप्राने तिच्या एकुलत्या एक वहिनीचे स्वागत करण्यासाठी जबरदस्त डान्स केला.

प्रियांकाने तिच्या वहिनीच्या स्वागतासाठी खास डान्स केला

भाऊ आणि वहिनीच्या संगीत कार्यक्रमात, प्रियांका चोप्रा सात खून माफमधील 'डार्लिंग आंखों से आंखों चार करने दो' आणि 'धन ते नान' या गाण्यावर जबरदस्त नाचली. यासोबतच, प्रियांका तिच्या भावी वहिनीसोबतही एक खास डान्स केला यासोबतच आणखी बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दोन्ही वहिनींची जोडी सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. यासोबतच, प्रियांकाचा नवरा निक जोनासने खास तू मन मेरी जान या गाण्यावरधमाकेदार परफॉर्मन्स दिला ज्यावर प्रियांका सह तिच्या परिवाराने डान्स करून आनंद साजरा केला.

Priyanka Chopra and Nick Jonas
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'; मराठी परंपरेचा वारसा जपणार कार्यक्रम लवकरच सोनी मराठीवर

जोनासच्या आवाजाची जादू

एकीकडे चोप्रा कुटुंब पंजाबी स्टाईलने हा लग्न समारंभ साजरा करत आहे, तर दुसरीकडे सिद्धार्थचा मेहुणा निक जोनास त्याच्या परदेशी शैलीने सर्वांचे मन जिंकताना दिसत आहे. त्याने या संगीत सोहळ्यात केवळ इंग्रजी गाणीच गायली नाहीत तर हिंदी गाणे गाऊन पाहुण्यांना आश्चर्यचकित केले.

Priyanka Chopra and Nick Jonas
chhabi Movie: फोटो आणि कॅमेऱ्यामागील गोष्ट आता रूपेरी पडद्यावर; 'छबी' चित्रपटातून उलगडणार अनोखी कहाणी

चाहत्यांना प्रियांकाचा लूक आवडला

प्रियांका तिच्या भावाच्या लग्नात वेगवेगळ्या सुंदर लुक मध्ये दिसत आहे. हळदीच्या कार्यक्रमात प्रियांकाने सुंदर शरारा परिधान केला होता, तर मेहंदीच्या संध्याकाळी प्रियांकाने ऑफ-शोल्डर स्टायलिश गाऊन घातला होता, तर संगीत कार्यक्रमात प्रियांकाने आणखी ग्लॅमर वाढवणाऱ्या निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com