AG Nadiadwala  Saam TV
मनोरंजन बातम्या

AG Nadiadwala: बॉलिवूड चित्रपट निर्माते ए. जी. नाडियाडवाला यांचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

AG Nadiadwala Passes Away | मुंबई : 'हेरा फेरी' आणि 'वेलकम' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियाडवाला उर्फ ​​एजी नाडियाडवाला यांचे आज, २२ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा फिरोज नाडियाडवाला याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अजय देवगणने एजी नाडियाडवाला यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'गफ्फारभाई नाडियाडवाला यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख झालं आहे. चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात माझे वडील आणि एजी नाडियाडवाला हे एकमेकांचे जवळचे सहकारी होते. एजी नाडियाडवाला यांच्या आत्म्याला शांती लाभो. नाडियाडवाला यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एजी नाडियाडवाला यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मुलगा निर्माता फिरोज नाडियाडवालाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'एजी नाडियाडवाला मधुमेह आणि दमा यांसारख्या आजारांनी ग्रस्त होते. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान मध्यरात्री १.४० वाजता त्यांचे निधन झाले'.

एजी नाडियाडवाला १९५३ सालापासून बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत कार्यरत होते. सुमारे सात दशकं त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. एजी नाडियाडवाला हे प्रदीप कुमार आणि दारा सिंह यांच्या 'महाभारत' सारख्या लोकप्रिय प्रोजेक्टचे भाग होते.

पाहा व्हिडीओ -

१९८४मध्ये एजी नाडियाडवाला यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या 'हेरा फेरी' या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी (Akshay Kumar and Sunil Shetty) या कलाकारांनी काम केले होते. २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटाचेही एजी नाडियाडवाला निर्माते होते. त्याचबरोबर २००७ मध्ये आलेल्या 'वेलकम' या कॉमेडी सिनेमाचीही त्यांनी निर्मिती केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT