Unlock Zindagi Poster Out Instagram
मनोरंजन बातम्या

Unlock Zindagi Poster: लॉकडाऊनच्या भयान आठवणींना उजाळा देणार ‘अनलॅाक जिंदगी’; अंगावर शहारा आणणारे पोस्टर प्रदर्शित

Upcoming Movie 2023: ‘अनलॅाक जिंदगी’ हा चित्रपट लॉकडाऊनच्या भयान आठवणींना उजाळा देणारा आहे.

Chetan Bodke

Unlock Zindagi Poster Out: एक ड्राइव्हर, एक व्यावसायिक, दोन हतबल स्त्रिया आणि एक शव. हे चित्र आहे दोन वर्षांपूर्वी सर्वांनी अनुभवलेल्या लॉकडाऊनमधलं. ‘अनलॅाक जिंदगी’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना ते चित्र रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या हिंदी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. (Bollywood Film)

लॅाकडाऊनच्या काळात एकमेकांशी संपर्क साधणं देखील फार कठीण होऊन बसलं होतं. इतकंच नाही तर, रक्ताची नातीही या काळात आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावली होती. अंगावर शहारा आणणाऱ्या या भयाण वास्तवाचे चित्रण या चित्रपटात दिसणार आहे. (Bollywood Actor)

काही नकारात्मक बाजू दिसत असल्या तरी या काळात काही सकारात्मक बदल सुद्धा माणसात नकळत घडत होते. त्यांची विचारसरणी बदलत होती. नात्यांचे महत्व अधिकच दिवसेंदिवस आणि परिस्थितीनुरूप कळत होते. या जमेच्या बाजूही या चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहेत.

पोस्टरमध्ये एक मुलगी आईचे सांत्वन करताना दिसत असून एक ॲम्बुलन्सही दिसत आहे. तर बाजूला दोन व्यक्ती हताश होऊन बसलेले दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा काय अर्थ आहे, याचे उत्तर आपल्यला येत्या १९ मे रोजी मिळणार आहे. (Latest Marathi News)

Unlock Zindagi Poster Out

दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, “कोरोना महामारी हे अवघ्या जगावर आलेले सर्वात मोठे संकट होते, लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. या परिस्थतीशी जुळवून घेतानाच कुठेतरी नात्यांचे महत्व सुद्धा या चित्रपटातून अधोरेखित होत आहेत. माणसामाणसांमध्ये झालेले सकारात्मक बदलांचे दर्शन या चित्रपटामध्ये घडेल. ‘अनलॅाक जिंदगी’ पाहताना प्रेक्षकांना कुठेतरी या परिस्थितीचा सामना आपणही केल्याचे जाणवेल. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे. ” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT