क्रिती सेनन आणि शाहिद कपूरच्या (Kriti Sanon And Shahid Kapoor) ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला दिलासादायक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
रोबोट आणि माणूस अशी हटके लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ९ फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे. चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपटाला दुसऱ्या विकेंडला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
चित्रपटामध्ये क्रिती सेनन एका सिफ्रा नावाच्या रोबोटच्या भुमिकेत तर शाहिद कपूर एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत आहे. एका वैज्ञानिकाची आणि रोबोटच्या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ही अनोखी कथा असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
कोट्यवधी रूपयांमध्ये चित्रपटाची निर्मिती झाली असून फक्त देशातच नाही जगभरामध्ये चित्रपट दिलासादायक कमाई करीत आहे. नुकतंच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये एकूण ४४. ३५ कोटींची कमाई केली होती. तर विकेंडला अर्थात रविवारी चित्रपटाने ६ कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिसवर जवळपास १० दिवसांत ५८.२० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये ९० कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट जगभरामध्ये १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे.अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत असून प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहे. शाहिद आणि क्रितीसाठी हा चित्रपट खास ठरला आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.
दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.