KKBKKJ 5th Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

KKBKKJ 5th Day Collection: सलमानच्या KKBKKJ ची असफल कामगिरी; तरीही करणार लवकरच १०० कोटींचा टप्पा पार...

‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

Chetan Bodke

KKBKKJ 5th Day Box Office Collection: ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ ला प्रेक्षकांकडून भर भरून प्रेम मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने दिलासादायक कमाई केली असून, ईद आणि वीकेंडचे निमित्त साधत चित्रपटाने दमदार कमाई केली. चला तर जाणून घेऊया चित्रपटाने प्रदर्शनाच्या पावव्या दिवशी किती कमाई केली.

‘किसी का भाई किसी की जान’ हा ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण चित्रपट आहे. सलमानच्या या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसांत ७८.३४ कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर जगभरात ‘किसी का भाई किसी की जान’ने १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. (Bollywood Film)

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या पाचव्या दिवसाचे आकडे चित्रपट ॲनालिस्ट आणि समिक्षक तरण आदर्श यांनी कमाईचा आकडा सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

तरण आदर्शने सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाच्या मंगळवारच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत. पोस्टनुसार, रिलीजच्या पाचव्या दिवशी ‘किसी का भाई किसी की जान’ ने केवळ ६.१२ कोटींचा व्यवसाय केला. सध्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८४.४६ कोटी रुपये इतके आहेत. (Bollywood Actor)

सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाने सध्या तरी दिलासादायक कमाई केली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी सलमान भाईचा चित्रपट त्याच्या चाहत्यांना आवडतो. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या वीकेंडला सुद्धा चित्रपट कोणती जादु निर्मात्यांना करून दाखवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT