Vidyut Jammwal Film IB71 Trailer Out: विद्युत जामवाल प्रमुख भूमिकेत असलेला ‘IB71’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले असून हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून १९७१ मधील एका मोठ्या गुप्त मिशनवर आधारलेला हा चित्रपट आहे. या गुप्त मिशनसाठी ३० एजंटने १० दिवसांत विजय मिळवण्याची तयारी केली होती. पाकिस्तान विरोधात देशाला विजय मिळवून देणारी कथा तब्बल ५० वर्षे अनेकांना ज्ञात देखील नव्हती. आता हीच कथा अनेक वर्षांनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. (Bollywood Film)
ट्रेलरची सुरुवात एका विमानापासून होते, त्या विमानाचा IB एजंट विद्युत जामवाल पायलट आहे. विमान क्रॅश होणार या भीतीमुळे सर्वच प्रवाशी घाबरलेले दिसत आहे. अनेक जण त्याला लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. १९६५ च्या युद्धानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर वचपा काढण्यासाठी मोठी तयारी केली होती. हा हल्ला थांबवण्याची ही साहस कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. (Entertainment News)
चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना १९७१ मध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धाचे साक्षीदार होण्याची संधी आता मिळणार आहे. या मिशनची कथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावरून अनुभवता येणार आहे. या दमदार ॲक्शनपटातून विद्युत जामवाल अभिनयासोबतच निर्माता म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अनेक दिग्गज सेलिब्रिटींची फळी दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले असून चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.