Fighter Film Sher Khul Gaye Song Out You Tube
मनोरंजन बातम्या

Sher Khul Gaye Song: ‘शेर खुल गये’मध्ये दीपिका- हृतिकचा अफलातून डान्स, डान्स मुव्ह्जने वेधले लक्ष

Deepika And Hrithik Fighter Film Song Out: दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटातील ‘शेर खुल गये’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Chetan Bodke

Fighter Film Sher Khul Gaye Song Out

दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट येत्या २५ जानेवारी २०२४ ला रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता ह्या टीझरनंतर चित्रपटातलं पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे.

‘शेर खुल गये’ असे गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशाल आणि शेखर, बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी या गाण्याला आवाज दिला असून हे गाणं विशाल आणि शेखरनेच ते संगीतबद्ध केलं आहे. ‘शेर खुल गये’ असे गाण्याचे बोल असून सोशल मीडियावर गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हृतिकने केलेल्या डान्सचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. सोबतच दीपिकाच्या लूकची आणि तिच्या स्टाईलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दोघांच्याही डान्स मुव्ह्जने सर्वांचेच लक्ष वेधले.

गाण्याला अवघ्या काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे एक पार्टी सॉंग असून गाण्यामध्ये दीपिकाबरोबर करण सिंग ग्रोव्हर आणि संजीदा शेखही दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ ला अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ‘पठान’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. दीपिका पादुकोण, हृतिक रोशन आणि अनिल कपूर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT