Sonam Kapoor's Blind Film Release On Jio Cinema Instagram
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor Comeback: बॉलिवूड अभिनेत्री ४ वर्षांनी वेगळ्या भूमिकेत दिसणार; पहिल्यांदाच OTT वर एन्ट्री

Sonam Kapoor's Blind Film Release On Jio Cinema: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता पुन्हा एकदा सोनम एका नवीन भूमिकेत दिसणार आहे.

Chetan Bodke

Sonam Kapoor In Blind Bollywood Movie: सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनम कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोनम काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता पुन्हा एकदा सोनम एका नवीन भूमिकेत दिसणार आहे.

सोनम कपूर ही नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. अशातच तिच्या नवीन चित्रपटामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोनम कपूरचा 'ब्लांइड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सोनम पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यात सोनम अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये सोनम बस स्टॅण्डवर बसची वाट बघत आहे. तेवढ्यात एक कार येते. सोनम त्या कारमध्ये बसते.

कार ड्रायव्हर सोनमला पाणी देतो. त्यावर सोनम त्याचे आभार मानते. काही वेळाने सोनमला कारमध्ये काहीतरी विचित्र जाणवतं. त्याबद्दल ती ड्रायव्हरला विचारते. नंतर सोनमचं शोषण होतं. त्यानंतर सोनम पोलिसांत तक्रार करते.

यानंतर पोलिस युकेतील महिलांचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेताना दिसत आहे. टीझरच्या शेवटी किडनॅपर सोनमला त्याचा पाठलाग न करायची धमकी देतो. सोनमच्या या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

या चित्रपटात थ्रील पाहायला मिळेल, असे तरी या टीझरवरून दिसतं. चित्रपटात सोनम कपूरसोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे दिसणार आहे.

सोनमने एका मुलाखतीत, चित्रपटाच शूटिंग लॉकडाउनच्या आधी झाल्याचे सांगितले आहे. सोनमने गरोदरपणात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटाचे शूटिंग त्याआधीच पूर्ण झाले होते. चार वर्षांनंतर सोनम पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे. सोनमचा 'ब्लांइड' हा चित्रपट ७ जुलैला जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Facts: मृत्यूनंतरही 'हा' अवयव असतो जिवंत; जाणून आश्चर्य वाटेल

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीने दिली पुणे महापालिकेची जबाबदारी

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

SCROLL FOR NEXT