Bajrangi Bhaijaan 2 Script Get Ready Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bajrangi Bhaijaan 2: 'बजरंगी भाईजान' चा सिक्वेल येणार, स्क्रिप्ट तयार; पण नेमकं कुठं अडतंय ?

Bajrangi Bhaijaan 2 Script: भाईजान सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल येणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार केली असून चित्रपट बनण्यासाठी अडथळा येत असल्याचं बोललं जात आहे.

Chetan Bodke

Bajrangi Bhaijaan 2 Script Get Ready

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या कमालीचा चर्चेत आहे. सलमान खानने ईदच्या मुहूर्तावर एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटाची घोषणा केली आहे. अशातच अभिनेत्याच्या आता आणखी एका आगामी चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेला 'बजरंगी भाईजान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा ब्लॉकबस्टर ठरला होता. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या सिक्वेलची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. तब्बल ९ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा होत आहे. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार केलेली असून चित्रपट बनण्यासाठी अडथळा येत असल्याचं बोललं जात आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘रुसलान’च्या कार्यक्रमामध्ये ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलबद्दल भाष्य केले आहे.

व्हिडीओमध्ये, विजयेंद्र प्रसाद ‘बजरंगी भाईजान २’ लवकरच बनणार असल्याचे म्हणाले आहे. चित्रपटाबद्दल अपडेट देताना विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, "चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. लवकरच चित्रपटाची कथा सलमानला सांगणार आहोत. त्यानंतरच चित्रपटाच्या पुढच्या कामाला सुरूवात होईल." सध्या, सोशल मीडियावर ‘बजरंगी भाईजान २’ची स्क्रिप्ट फायनल झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार होत आहे. (Bollywood Film)

निर्माता के.के.राधामोहन यांनी 'बजरंगी भाईजान २'ची कथा एसएस राजामौलीचे वडील आणि प्रसिद्ध लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याकडून लिहून घेतली आहे. सलमान खानने २०२१ मध्ये बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची घोषणा केली होती. यानंतर व्ही. विजयेंद्र प्रसाद चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचा खुलासाही केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे नाव 'पवन पुत्र भाईजान' असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटामध्ये भाईजानसोबत पूजा हेगडे लीड रोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 'बजरंगी भाईजान' मध्ये लीड रोडमध्ये, सलमानसोबत करीना कपूर खान होती. पण आता 'बजरंगी भाईजान २' मध्ये पूजा हेगडे दिसण्याची शक्यता आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Bollywood News)

‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सलमान खानच्या हिट चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. चित्रपटात सलमान खानसोबत करीना कपूर, हर्षली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी, अशी तगडी स्टारकास्ट होती. चित्रपटाने भारतात ३२०.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, जगभरात या चित्रपटाने ७०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कोणकोणती स्टारकास्ट चित्रपटामध्ये दिसणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT