Adipurush Release Date
Adipurush Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Release Date:अखेर ‘आदिपुरूष’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Chetan Bodke

Adipurush New Release Date: प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनन (Kriti Senon) प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘आदिपुरूष’ (Adipurush) चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाला ट्रोलिंगचा (Trolled) सामना करावा लागला होता. त्यामुळे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला होता. हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता वैष्णोदेवीचे दर्शन घेत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपट 3D मध्ये 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘आदिपुरूष’ चित्रपटात प्रभासने प्रभू रामची, क्रितीने सीतेची तर सैफ अली खानने रावणाचे पात्र साकारले आहे. T-Series ने त्यांच्या सोशल मीडियावर पेजवर दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांनी दर्शन घेतलेला फोटो शेअर केला आहे, फोटो पोस्ट करत कॅप्शन बॉक्समध्ये, ‘आशीर्वादासाठी वैष्णो देवीच्या दारात... 16 जून 2023 रोजी आदिपुरुष थिएटर्समध्ये 3D फॉर्मेटमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’ असा आशय लिहित पोस्ट शेअर केली आहे. निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताच चित्रपटाचे प्रमोशनही सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

‘आदिपुरूष’ चित्रपट यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच चित्रपट व्हिएफएक्सच्या बाबतीत खूपच वाईट म्हणत चित्रपटाला ट्रोल केले. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण व्हिएफएक्समुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

‘आदिपुरूष’ चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर यांनी केली असून दिग्दर्शन ओम राऊतचे आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंगही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT