Adipurush 9th Day Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush 9th Day Collection: ट्रोल होणारा ‘आदिपुरुष’ लवकरच गाशा गुंडाळणार? नवव्या दिवशी केली केवळ ‘इतकी’च कमाई

Adipurush Box Office Collection: चित्रपटाची सध्याची कमाई पाहता सर्वांनाच हा चित्रपट लवकरच थिएटरमधून बाहेर जातो की काय अशी अवस्था निर्माण झाली.

Chetan Bodke

Adipurush 9th Day Box Office Collection: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ची दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत फारच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर चित्रपट ज्याप्रकारे बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय, त्याकरिता दुसरा आठवडा निर्मात्यांसाठी फारच आव्हानात्मक आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटाची सध्याची कमाई पाहता सर्वांनाच हा चित्रपट लवकरच थिएटरमधून बाहेर जातो की काय अशी अवस्था निर्माण झाली.

आठव्या दिवशी प्रमाणे नवव्या दिवसाचीही परिस्थिती सारखीच आहे. शनिवार- रविवार वीकेंडमुळे प्रेक्षक थोडी गर्दी करतील, अशी अपेक्षा होती, मात्र काही तरी वेगळंच चित्र दिसत आहे. ‘रामायण’ वर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सध्या सर्वच स्तरातून विरोध कायम होत आहे.

‘सॅकल्निक’च्या अहवालानुसार, शनिवारी ९व्या दिवशी ‘आदिपुरुष’ने देशभरात ५.५ कोटींचे कलेक्शन केलेय. चित्रपटाने हिंदी भाषेत ३.२२ कोटी, तेलुगूमध्ये १.८३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर शुक्रवारी चित्रपटाने देशात ३.४ कोटींचा व्यवसाय केला होता. नऊ दिवसांत चित्रपटाचे एकूण जगभरातील कलेक्शन आता २६८.३५ कोटी रुपये आहे.

पहिल्या आठवड्यात कमाई - रु. 259.90 कोटी.
शुक्रवार, 8व्या दिवसाची कमाई - 3.40 कोटी रुपये.
शनिवार, 9व्या दिवसाची कमाई - 5.05 कोटी रुपये.
देशातील चित्रपटाची एकूण कमाई - 268.35 कोटी रुपये.

शुक्रवारच्या तुलनेत ‘आदिपुरुष’च्या शनिवारच्या कमाईत थोडी फार वाढ झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहाव्या दिवशी देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कमाईत घट व्हायला चौथ्या दिवसापासूनच सुरूवात झाली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला पाठ फिरवल्यामुळे चित्रपटाच्या शोच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नुकतंच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहित चित्रपटाच्या निर्मात्यांवर तक्रार दाखल करण्याची मागणी केलीय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादांमुळे चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी १४३ कोटींची जगभरात कमाई केली होती. आता दुसऱ्या आठवड्यातच हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ३०० कोटींचा आकडाही पार करेल की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT