Kanguva Movie Review google
मनोरंजन बातम्या

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Kanguva Movie Review: कांगुवा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलेला असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कांगुवा हा नवीन चित्रपट रिलीज झाला आहे. कांगुवा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. या चित्रपटामध्ये सूर्या आणि बॅाबीची प्रमुख भूमिका असून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे प्रचंड वेड होते. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि बरचं काही पाहायला मिळणार आहे. कांगुवा हा चित्रपट काल १४ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

कांगुवा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून, प्रेक्षकांना तो फार आवडला आहे. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी प्रेक्षकवर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होते. पण काल हा चित्रपट एका शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. कांगुवा चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना चित्रपटामधील अप्रतिम दृश्ये, सूर्या आणि बॅाबी देओलची ॲक्शन भूमिका फार आवडली आहे. याबरोबर त्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटात दाखवलेली सर्व चित्रे अप्रतिम आहेत. हा चित्रपट आपल्याला एका नव्या विश्वात घेऊन जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. याबरोबर कांगुवाची संपूर्ण स्टोरी खूप रंजक पद्धतीने सादर केली आहे.

कांगुवा चित्रपटामध्ये सूर्या फ्रान्सिस हा कांगुवाचा डबल रोल करत आहे. तर याबरोबर या चित्रपटात आपल्याला दिशा पटानी, बॅाबी देओल, नटराज सुब्रमण्यम, केएस रविकुमार, योगी बाबू यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा संपूर्ण चित्रपट ३०० कोटी बजेटमध्ये करण्यात आला आहे. याबरोबर प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, सूर्या आणि बॅाबी देओल त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर कांगुवाचे खूप कौतुक होत आहे. प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, या चित्रपटाचा इंटरव्हल देखील खूप धमाकेदार होता. याबरोबर यूजर्स चित्रपटामधील सर्व गोष्टींचे खूप बारकाईने वर्णन करत आहे. कांगुवाने त्याच्या उत्कृष्ट स्टोरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कांगुवा चित्रपटातील VFX प्रेक्षकवर्गाला फार आवडला असून त्यांनी खूप कौतुक केले आहे.

कांगुवा चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामुळे या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. कांगुवाने बॅाक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ४० कोटी एवढी कमाई केली आहे. अशा पद्धतीने कांगुवा चित्रपट अजून कमाई करण्याची शक्यता आहे.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT