Sanjay Leela Bhansali Instagram @bhansaliproductions
मनोरंजन बातम्या

Sanjay Leela Bhansali: ...कलाकारांना अशी वागणूक देतात संजय लीला भन्साली; स्वतःच सांगितले यामागचे कारण

वेबसीरीजच्या टीझर लाँच कार्यक्रमामध्ये भन्साली यांनी त्यांच्या स्वभावावर भाष्य केले आहे.

Pooja Dange

Sanjay Leela Bhansali Behaviour With Actors: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक संजय लीला भन्साली सध्या त्यांच्या आगामी वेबसीरीजमुळे चर्चेत आहेत. 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक कालच प्रदर्शित झाला आहे. 'हीरामंडी'च्या फर्स्ट लूकमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी या अभिनेत्री शाही अंदाजात दिसत आहेत.

संजय लीला भन्साली हे एक कडक शिस्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. ते कधी एखाद्या रिंग मास्टरसारखे वाटतात तर कधी दिलखुलास व्यक्ती. दरम्यान या वेबसीरीजच्या टीझर लाँच कार्यक्रमामध्ये भन्साली यांनी त्यांच्या स्वभावावर भाष्य केले आहे.

भन्साली यांनी सांगितले की, माझी अशी कडक शिस्तीचा व्यक्ती अशी व्यक्तिरेखा मीडियाने बनवली आहे. भन्साली कलाकारांना खूप सहकार्य करतात. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही एक कडक शिस्त असलेले टास्क मास्टर आहेत, ज्यांच्यासोबत काम करणे खूप कठीण आहे? यावर उत्तर देत भन्साली म्हणाले, 'असं काही नाही. मी टास्क मास्तर वैगेरे काही नाही, माध्यमांनी माझी अशी प्रतिमा बनवली आहे की माझ्यासोबत काम करणे कठीण आहे आणि मी रागिष्ट आहे.'

'सेटवर आम्ही सगळे एकत्र बसतो -उठतो. चर्च आकारतो. मी त्यांच्या मेंदूचा वापर करतो आणि ते माझ्या मेंदूचा वापर करतात. आम्ही सर्व एकत्र येतो आणि तो जादूचा क्षण आमच्या जवळ येतो, ज्याचे श्रेय मी घेतो आणि म्हणतो ही जादू मी केली आहे.'

'परंतु या जादूच्या मागे अनेक डोकी आहेत जे हे सत्यात उतरवण्यात मदत करतात. हे ते क्षण आहेत ज्याची तुम्ही वाट पाहत असता. हे खूप मेहनत आणि फोकस केल्यानंतरच सध्या होते. मला लोक टास्क मास्टर म्हणतात कारण, मी त्यांना तोपर्यंत वॅनमध्य जाऊ देत नाही जोपर्यंत मला माझ्या मनासारखा शॉट मिळत नाही. तो प्रत्येक क्षण आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. तो फक्त माझ्यामुळे येत नाही, तर त्यामागे सर्वांची मेहनत असते.'

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भन्सालींसोबत काम केले आहे. तसेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला आहे. संजय लीला भन्साली यांची आगामी वेबसीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT