Farah Khan Struggle Story on Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Farah Khan Birthday: बॅकडान्सर ते कोरियोग्राफर; फराह खानचा बॉलिवूडमधील खडतर प्रवास

Farah Khan Turns At 59 Age: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयातच नाही तर, डान्स कोरिओग्राफर आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते.

Chetan Bodke

Farah Khan Struggle Story on Birthday

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयातच नाही तर, डान्स कोरिओग्राफर आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते. फराह खान नेहमीच आपल्या साधेपणाने चाहत्यांचे मन जिंकत असते. तिने आपल्या करियरची सुरूवात कोरिओग्राफर म्हणून केली होती.

मात्र, आता ती बॉलिवूडची एक प्रसिद्ध निर्माती, होस्ट आणि परीक्षक बनली आहे. आज (९ जानेवारी) फराह खान आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. फराह खानचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय होतं. त्यामुळे आपणही याच क्षेत्राकडे वळायचं असा निर्धार तिने सुरुवातीलाच केला होता.

फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराहला तिचा पहिला प्रोजेक्ट मोठ्या कष्टाने मिळाला. पूर्वी फराह आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नाचण्यासारखी छोटी-मोठी नोकरी करायची.

फराह खानचा भाऊ आणि बिग बॉस फेम साजिद खानने याबद्दलची माहिती दिली. वडीलांचे आजारपणामध्ये निधन झाल्यामुळे तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जुहू बीचवर डान्स करून ती संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. त्याचबरोबर भाऊ साजिदनेही पार्टीत जोकरचं काम करून पैसे कमावले आहेत.

फराहने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, "मी जवळपास १५ वर्ष खूप मेहनत घेतली. मी शाळेत असतानाच माझ्यावर संपूर्ण घराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आली होती. माझ्या वडीलांचे काही अल्पशा आजाराने निधन झाले होते. मी अनेकदा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. ते काम करत असताना मला १९९३ मध्ये 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटात सरोज खान यांनी कोरिओग्राफी करणं मध्येच बंद केली. त्यामुळे मला 'पहला नशा हे' गाणं कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यानंतर शाहरुख खानच्या चित्रपटातील 'कभी हा कभी ना' हे गाणे करण्याची संधी मिळाली."

आज फराह बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आहे. तिने किंग खानच्या चित्रपटातील अनेक गाण्यांची करिओग्राफी केली आहे. तिच्या दिग्दर्शनाखाली ‘मैं हूं ना’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्यानंतर फराहने ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘तीस मार खान’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फक्त आपल्या कामामुळेच नाही तर, तिच्या स्टाइलचेही बॉलिवूडमध्ये कौतुक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

SCROLL FOR NEXT