Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha News: कीर्तनाच्या परंपरेचा वारसा! संत परंपरेतून नव्या पिढीला मिळणार नवी शिकवण

Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha Serial: कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा”.
Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha
Vasa Sanskruticha Varsa KirtanachaSaam Tv
Published On

Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha News

"ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस..." महाराष्ट्राला लाखो वर्षांपासून मिळालेला इतिहास म्हणजे आपली संत परंपरा. संत परंपरेतील अनेक संत कीर्तन करायचे. पूर्वी देवाच्या पूजेसोबतच अनेक संत कीर्तनही करायचे.

आपण सर्वच कायमच अभिमानाने आणि तितकच गर्वाने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे म्हणतोच. आपल्या महान संतांनी त्यांचे विचार संतवाणी ही विविध अभंगातून आपल्याला सांगितली आहे. पण सामान्य माणसाला त्यातला मतितार्थ समजणे तसे कठीण आहे.

त्यामुळेच तयार झालेत आपले कीर्तनकार. कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा मानस ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीचा आहे.

Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha
Lockdown Lagna: प्रवीण तरडेच्या 'लॉकडाऊन लग्न'चे पोस्टर रिलीज, ८ मार्चला येणार भेटीला

‘सन मराठी’ वाहिनी आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी, पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. ते पाऊल म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणारा कार्यक्रम “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा”.

नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी होणार हे नक्की. ९ जानेवारी २०२४ पासून सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालेला वारसा, अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न ‘सन मराठी’ वाहिनीने केला आहे.

‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.

आपले कीर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच म्हणा ना. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून निळोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे कीर्तन. कीर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते.

काही कीर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री कीर्तनकार घेत असतात.

कीर्तन आता पुढच्या पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहचणार, याची खात्री ‘सन मराठी’ वाहिनी घेणार असून प्रत्येकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी ९ जानेवारी २०२४ पासून सकाळी ७:३० वाजता “वसा संस्कृतीचा - वारसा कीर्तनाचा” हा कार्यक्रम नक्की पाहा आणि आपल्या घरातील तरुण पिढीला सुध्दा नक्की पाहायला सांगा.

Vasa Sanskruticha Varsa Kirtanacha
Tanushri Punekar vs Gautami Patil: नव्या गौतमीने मार्केट केलं जाम; दिसायला अगदी सेम टू सेम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com