Sushant Singh Rajput Duplicate: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत नेहमीच आपल्या दमदार भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अवघ्या काही वेळातच अभिनेत्याने सिनेसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. अभिनेत्याच्या निधनाला तीन वर्ष उलटले असून तो आजही आपल्या अभिनयातून चाहत्यांमध्ये जिवंत आहे.
सुशांतच्या अनेकदा काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशातच सुशांतचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सुशांत सिंह राजपूतसारखाच दिसणाऱ्या तरूणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या तरूणाला पाहून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंतही देखील बुचकळ्यात पडलीय.
अनेकदा राखी सावंतने सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. अनेकदा राखी सावंतने त्याची बाजू घेत त्याला न्याय देण्याची मागणी केली होती. नुकतंच सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुशांत सिंह राजपूतसारखा दिसणाऱ्या एका कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या कंटेंट क्रिएटरचा व्हिडीओ पाहून युजर्ससह राखी सावंतने देखील आपली प्रतिक्रिया दिली. सुशांतसारखा दिसणाऱ्या त्या तरूणाचे नाव डोनिम अयान आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.
सुशांतचा चेहरा आणि डोनिमचा चेहरा खूपच मिळताजुळता आहे. तरूणाचा व्हिडीओपाहून युजर्सला सुशांतला पाहत असल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया दिली. सुशांतसारखा अगदी डुप्लिकेट चेहरा असल्याने अनेकांनी हा सुशांत सिंह राजपुत तर नाही ना? असा देखील प्रश्न विचारला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओवर राखी सावंतने केलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे, “तो बदला घेण्यासाठी परत आलाय, कर्म!” या व्हिडिओवर राखीसह अनेक युजर्सने त्या व्हिडीओवर रिॲक्ट केलंय. (Bollywood)
त्या व्हिडीओवर एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे, ‘अरे देवा, सेम टू सेम।’, तर आणखी एका युजर कमेंट करत म्हणतो, ‘हा हुबेहूब सुशांतसारखाच दिसतोय..’ सध्या सर्वत्र डेनिम आयन याच्या लूकची चर्चा रंगत आहे.
सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलायचे तर, १४ जून २०२० मध्ये त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्याचे निधन होऊन तब्बल तीन वर्ष झाले असले तरी, त्याच्या निधनाचं कारण गुलदस्त्यात कायम आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.