Pravin Tarde In South Movie : खतरनाक...प्रवीण तरडेंनी सांगितली टॉलिवूडमधील शिस्त; शेअर केला साऊथमधल्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव

Pravin Tarde New Movie : साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत सांगितला.
Pravin Tarde
Pravin TardeSaam Tv
Published On

Pravin Tarde Share Experience In Working South Movie :

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा सर्व भूमिका उत्तम पेलणारा मराठमोळा कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण तरडे मराठीनंतर आता थेट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत सांगितला.

प्रवीण तरडे त्यांचा बेधडक आणि दिलखुलास स्वभावामुळे ओळखले जातात. 'RRR'चे दिग्दर्शक एस.एस.राजामौलीसोबत काम करणे हे त्यांचे सर्वात मोठं स्वप्न होते,असा खुलासा प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत केला आहे. मुलाखतीत हे स्वप्न पुर्ण होतानाच्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितले.

Pravin Tarde
Subhash Ghai On Khalnayak : 'चोली के पीछे...' गाण्यावरून झाला तुफान राडा; ३० वर्षानंतर सुभाष घई यांनी व्यक्त केली शोकांतिका

नुकतीच प्रवीण तरडेंनी 'बोल भिडू' या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्य कलाकारांच्या शिस्तीवर भाष्य केलं आहे. 'दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकला शिस्तीचे पालन करावे लागते. मी तर म्हणेन, साउथमधला प्रत्येकजण नियमांचे पालन करतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीतही प्रत्येकजण नियमांचे पालन करतात. सर्व कलाकार वेळेत येतात. कोणीही उशीरा येत नाही. पण साउथची एक खासियत म्हणजे, कलाकार सकाळी ७ ची शिफ्ट असेल तर साडेसहालाच येऊन आपली पुढची तयारी करतात'. असे प्रवीण तरडेंनी सांगितले.

साउथच्या सेटवरच्या शिस्तीविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, 'मला तयारी करण्यासाठी जवळपास अडीच तास लागायचे. त्यामुळे सातच्या शिफ्टसाठी पहाटे साडेतीनला सहाय्यक दिग्दर्शक उठवायला यायचे. माझा मेकअप चार वाजण्याच्या सुमारास सुरु व्हायचा. अडीच तासाच्या तयारीनंतर बरोबर ७ वाजता मी सेटवर हजर रहायचो. सात वाजता ओके टेकचा आवाज यायचा. एवढी शिस्त मी अजुनपर्यंत कुठेच पाहिली नाही'.

Pravin Tarde
‘The Elephant Whisperers’फेम बोमन- बेलीने केले दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘ऑस्करनंतर मेकर्सचं वागणं...’

'साउथ इंडस्ट्रीत जशी काम सुरु व्हायची वेळ अचूक असते. तशीच काम संपण्याचीही अचूक वेळ असते. वेळेत शुटिंग सुरु झाल्यानंतर ते वेळेतच संपायचे. काहीवेळा शुटिंग वेळेआधी संपले तर सरसकट पॅकअप बोलले जाते. ही साउथची शिस्त आहे. आपल्या मराठीतीलही अनेक कलाकर साउथमध्ये सेट झाले आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे'. असे प्रवीण तरडेंनी सांगितले.

प्रवीण तरडेंनी आजपर्यंत अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. परंतु आपले स्वप्न असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचने प्रवीण तरडे खूप आनंदी आहेत. एस.एस राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून प्रवीण तरडे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com