Subhash Ghai On Khalnayak : 'चोली के पीछे...' गाण्यावरून झाला तुफान राडा; ३० वर्षानंतर सुभाष घई यांनी व्यक्त केली शोकांतिका

Controversy Of Choli Ke Peeche : लोकांनी 'चोली के पीचे' गाणे अश्लील आहे, असे म्हटले होते.
Subhash Ghai Spoke About Choli Ke Peeche... Song Controversy
Subhash Ghai Spoke About Choli Ke Peeche... Song Controversy Saam TV

Sanjay Dutt Was Arrested Before Khalnayak Releasing :

संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट 'खलनायक'ला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ अभिनीत 1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' त्या दशकातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. संजय दत्तची निगेटिव्ह व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. चित्रपटाच्या 30 व्या वर्षपुर्तीनिमित्त चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी चित्रपटाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

सुभाष घई यांनी सांगितलं की 'खलनायक'मधलं 'चोली के पीचे' हे गाणं लोकगीत म्हणून बनविण्यात आलं होतं आणि त्यावर झालेल्या गदारोळामुळे ते हैराण झाले होते. कारण प्रेक्षकांना या गाण्याचे सूर आवडले नव्हते, त्यामुळे या गाण्यावरून बराच वाद झाला होता. हा चित्रपट अतिशय पारंपारिक शैलीत बनवण्यात आला होता.

Subhash Ghai Spoke About Choli Ke Peeche... Song Controversy
Sachin Tendulkar Watch Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला; ट्वीट करत चित्रपटाचे केले कौतुक

दिग्दर्शक सुभाष घई यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मला 'खलनायक' चित्रपटाची सर्वात खास गोष्ट आठवते जेव्हा लोकांनी 'चोली के पीचे' गाणे अश्लील आहे, असे म्हटले होते.

सुभाष घई त्यांच्यासाठी ही शोकांतिका होती. म्हणजेच हा मोठा धक्का होता. कारण त्यांनी ते लोकगीताप्रमाणे बनवले आणि आर्टिस्टच्या दृष्टाकोनातून सादर केले, पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या गाण्याला प्रचंड विरोध झाला.

सुभाष घई म्हणतात की 'चोली के पीचे' हे गाणे प्रसिद्ध गायक आनंद बक्षी यांनी लिहिले होते, तर संगीत दिग्दर्शक जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते. गायिका अलका याज्ञिकने गाण्यात माधुरी दीक्षितसाठी पार्श्वगायन केले, तर इला अरुणने नीना गुप्ता यांना आवाज दिला होता.

सुभाष घई यांनी असेही सांगितले की, एका वृत्तपत्राने या गाण्याबद्दल लिहिले होते की, 'हे गाणे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम उदाहरण आहे' आणि हे माझ्यासाठी खुप समाधानकारक होते. हे लोकगीत आहे आणि आता लोकांना ते समजले आहे.

'चोली के पीछे' या गाण्यावरून केवळ वादच नाही असे नाही. तर या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या संजय दत्तला दहशतवादी आणि विघटनकारी कारवाया (प्रतिबंध) टाडा कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याने चित्रपटासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सुभाष घई यांनी सांगितले की, जेव्हा संजू (संजय दत्त)ला अटक करण्यात आली. तेव्हा असे काही घडेल, असे कोणीही वाटले नव्हते. यावरुन खुप राडा झाला.

जेव्हा या चित्रपटाते प्रदर्शन दोन महिन्यांवर आला तेव्हा संजय चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका करत असल्याने लोक चित्रपटाला विरोध करू लागले. प्रसारमाध्यमे आणि लोक उत्साहात खूप काही बोलून जातात, पण कालांतराने ते चूक होते हे त्यांच्या लक्षात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com