Kashmir Files Unreported' To Release Soon Twitter
मनोरंजन बातम्या

Kashmir Files Unreported' To Release Soon: विवेक अग्निहोत्रींनी केली आगामी चित्रपटाची घोषणा, काश्मिर फाईल्सचा सिक्वेल लवकरच

The Kashmir Files Unreported Teaser: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा सिक्वेलची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Vivek Agnihotri New Film Declared On Social Media: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेल्या चित्रपटाने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला डंका वाजवला. चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा विचार केला आहे. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आगमी चित्रपटाच्या सिक्वेल काढणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार केला होता. लॉकडाऊनमध्ये इतकी दमदार आणि भरघोस कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाला काही काळ विरोधाचा देखील सामना करावा लागला होता. चित्रपट प्रदर्शनानंतर सर्वच स्तरातून जेवढा विरोध झाला तेवढाच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

काल ट्वीटरवर विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती दिली. चित्रपटाचा टीझर शेअर करताना, दिग्दर्शकांनी कॅप्शन दिले की, “अनेक नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी काश्मीर फाइल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे. ज्यावर फक्त एक शैतानच प्रश्न करू शकतो. लवकरच येत आहे, ‘द काश्मिर फाईल्स अनरिपोर्टेड’ (The Kashmir Files Unreported) येत आहे. ‘रडायला तयार राहा’ ” असं म्हणत अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझरही शेअर केला आहे.

त्यामुळे या पुढच्या भागातून आपल्याला नक्की काय पाहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच उत्सुक्ता लागली आहे. हा चित्रपट झी ५ (Zee 5) वर प्रदर्शित होणार आहे.

काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक या कलाकारांनीही मुख्य भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT