Sajid Khan TWITTER
मनोरंजन बातम्या

Sajid Khan : साजिद खानने विकले जुहूमधील अपार्टमेंट, कोटींमध्ये झाली डील

Sajid Khan Sold His Apartment : २,१७६ चौरस फुट क्षेत्रफळात पसरलेले आणि २२० चौरस फुटांची स्वतंत्र पार्किंगची जागा असलेले जुहूमधील अपार्टमेंट साजिदने ६.१ कोटी रुपयांना विकले आहे.

Saam Tv

बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खान याने मुंबईच्या जुहू भागात असलेले त्याचे अपार्टमेंट नुकतेच विकले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार त्याने हे अपार्टमेंट ६.१ कोटी रुपयांना विकले आहे. जुहूच्या बीच हाऊस को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हे अपार्टमेंट आहे.

साजिद हा नृत्यदिग्दर्शिका फराह खानचा भाऊ आहे. साजिदने हाऊसफुल चित्रपट मालिका, हे बेबी, हमशकल्स या त्याच्या नावाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने नच बलिये या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पहिले आहे. साजिदचे जुहूमधील अपार्टमेंट हे २,१७६ चौरस फुट क्षेत्रफळात पसरलेले आहे.

या अपार्टमेंटला २२० चौरस फुटांची स्वतंत्र पार्किंगची जागा आहे. जुहूचा हा परिसर सधन आणि संपन्न म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्राचे चित्तथरारक दृश्य दाखवणाऱ्या अनेक मोठ्या इमारती इथे बघायला मिळतात. यावर्षी जून महिन्यात नोंदणी झालेल्या या व्यवहारासाठी ३६.६ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.

दिग्दर्शक साजिद खान याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९५ साली मे भी डिटेक्टीव्ह या टीव्ही शोचे होस्टिंग करून केली होती. त्यानंतर त्याने डरना जरूरी हे या २००६ साली आलेल्या सहा लघुकथा असलेल्या अँथॉलॉजी चित्रपटाचे दिग्दर्शन करून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. साजिद बिग बॉस सीजन १६ मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

SCROLL FOR NEXT