Pradeep Sarkar Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Pradeep Sarkar Passed Away: बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

Pradeep Sarkar Death: प्रदीप सरकार यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.

Pooja Dange

Pradeep Sarkar News: बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच आज निधन झालं आह. वयाच्या ६७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिटी हॉस्पिटलमध्ये त्याचे पहाटे ३.०० - ३.३० च्या सुमारास निधन झाले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रपट निर्माता आणि जिवलग मित्र प्रदीप सरकार या वेड्या माणसाने आज सकाळी आपला निरोप घेतला आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तुमची सिनेमा बनविण्याच्या कलेची आवड तुमच्या कामात कायम राहिली! दुनिया भर की मिट्टी इकठ्ठी करते अब जन्नत की मिट्टी दिबिया में भरना.माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद"

अजय देवगणने लिहिले की, "प्रदीप सरकार यांचे निधन, आपल्यापैकी अनेकांना 'दादा' गेलेत हे पचायला जड जाईल. माझ्या मनापासून संवेदना. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. RIP दादा"

विद्या बालन आणि सैफ अली खान स्टारर परिणीता या चित्रपटातून सरकार यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. प्रदीप सरकार यांना मोस्ट प्रॉमिसिंग डायरेक्टरचा झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा गिल्ड पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी आयफा पुरस्कार आणि परिणीताला सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

प्रदीप सरकार यांनी परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दांनी अश्या अनेक सिनेमचे दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Sweet Dish Recipe : मुलं नेहमी गोड खाण्याचा हट्ट करतात? मग फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT