Priyanka Chopra Latest News/Social Media SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' प्रियांकाने शेअर केला कुणी-कधी न पाहिलेला फोटो, म्हणाली...

प्रियांका चोप्राने थ्रोबॅक फोटो शेअर केल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तिच्यावर कमेंटमधून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Actress Priyanka Chopra News | मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रियंका चोप्राचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. प्रियांकाची प्रोफेशनल लाईफपासून पर्सनल लाइफपर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या प्रियांकाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या बालपणीचा एक कधी न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमधे ती दिवंगत डॉ. अशोक चोप्रा यांच्यासोबत दिसते आहे. वडिलांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. प्रियांकाचा हा फोटो वडिलांसोबत पर्यटनासाठी गेली होती, त्यावेळचा आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने वडिलांसोबतच्या तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रियांका बर्फाशी खेळत आहे. सोबतच तिचे वडील अशोक चोप्रा हे देखील आहेत. प्रियांका लहानपणीच्या या फोटोमध्ये वडिलांसोबत आनंदात दिसते. तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. प्रियांकाने फोटो काश्मीर व्हेकेशनचे असल्याचे सांगितले आहे. फोटो शेअर करत प्रियांकाने "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आम्हाला तुमची आठवण येते. नेहमीच " अशी कॅप्शन दिली आहे. (Bollywood News)

प्रियांका चोप्राच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स कमेंट केल्या आहेत. प्रियांकाच्या या पोस्टवर प्रियांकाचा पती सिंगर निक जोनासने 'रेड हार्ट' इमोजी कमेंट केली आहे. यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. खुशी कपूरनेही 'व्हाइट हर्ट' इमोजी पोस्ट केली आहे. याशिवाय प्रियांकाचे चाहते या फोटोवर तिच्या क्यूटनेसचे कौतुक करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा हे भारतीय लष्करातील डॉक्टर होते. १० जून २०१३ रोजी कर्करोगामुळे त्याचं निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर प्रियांका नैराश्यात होती. याबद्दल अनेकदा प्रियांकाने सांगितले आहे. प्रियांकाने तिच्या मनगटावर डॅडिज् लिटील गर्ल असा खास टॅटू काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT