saif Ail Khan And Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif-Kareena Trolled: करीना -सैफला चूक भोवली, नेटकऱ्यांनी धरले धारेवर

सैफ आणि करीनाने नियमांचे पालन न केल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saif-Kareena Got Trolled For Not Wearing Seat Belt: बॉलिवूडचे स्टार कपल सैफ अली खान आणि करीना कपूर नेहमीच चर्चेत असतात. सैफ आणि करीना नेहमीच आपल्याला एकत्र दिसतात. बऱ्याचदा त्यांची मुले देखील त्यांच्यासोबत असतात. यावेळी सैफ आणि करीना स्पॉट झाले पण त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. त्यांच्या या चुकीमुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे.

सैफ आणि करीना त्यांच्या कारमधून घराबाहेर पडले. सैफ कार चालवत होता. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी पापाराझी बाहेर उभे होते. कारमध्ये बसून दोघे बाहेर येताच फोटोग्राफरने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सैफ आणि करीना अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसत होते. तर करीना नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

मात्र एका छोट्याशा चुकीमुळे दोघांनाही युजर्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहत असताना सोशल मीडिया यूजर्सच्या लक्षात आले की, सैफ आणि करीना दोघेही कारच्या पुढच्या सीटवर बसले आहेत. पण दोघांनीही सीट बेल्ट लावला नव्हता. या जोडप्याच्या या निष्काळजीपणामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. कमेंट करत एकाने लिहिले, सीट बेल्ट कुठे आहे? दुसऱ्या युजरने लिहिले, चिल करा, नियम फक्त सामान्यांसाठी आहेत.

करीना कपूर लवकरच दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या पुस्तकावर आधारित आहे. यात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकंच नाही तर करिनाकडे दिग्दर्शक हंसल मेहताचा पुढचा अनटाइटल्ड चित्रपटही आहे. सैफ अली खानबद्दल बोलायचे तर तो आदिपुरुषमुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

SCROLL FOR NEXT