Lata Mangeshkar Saam TV
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar: दीदींच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा; दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

आता बॉलिवूडमधील सर्व दिग्गज सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर आणि दिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. रातकीय, सामाजीक, सांस्कृतीक, संगीत क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यात आता बॉलिवूडमधील सर्व दिग्गज सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर आणि दिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थीव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT