Kiara Advani and Sidharth Malhotra Instagram @sidmalhotra
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची सनई लकवरच वाजणार, गोल्डन सिटीमध्ये रंगणार रॉयल विवाहसोहळा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

Pooja Dange

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: बॉलिवूडमधील ऑन स्क्रिनवरील सर्वात लाडकी जोडी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या रियल लाईफमधील लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहे. दोघांनाही अद्याप त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत दोघांचे लग्न समारंभ, प्री-वेडिंग आणि पोस्ट-वेडिंग फंक्शन्स होतील. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाचे ठिकाणही समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्न समारंभ जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस येथे पार पडणार आहे.

सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या लग्नासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांच्या लिस्टमध्ये बी-टाऊनमधील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे. शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत दोघांच्या लग्नाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांची हळद आणि संगीत सोहळा 6 फेब्रुवारीला म्हणजेच लग्नाच्या दिवशीच होणार आहे.

या अहवालात असेही सांगितले आहे की, कियारा आणि सिद्धार्थच्या या बिग फॅट वेडिंगसाठी सुमारे 84 लक्झरी रूम बुक करण्यात आल्या आहेत, ज्यांचे दररोजचे भाडे सुमारे एक ते दोन कोटी रुपये आहे. यासोबतच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी 70 हून अधिक आलिशान वाहने बुक करण्यात आली आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये ४ फेब्रुवारीपासून पाहुणे येण्यास सुरुवात होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, जैसलमेरमध्ये लग्नानंतर, हे जोडपे मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कियारा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत स्पॉट झाली होती. तर तिथे सिद्धार्थ मल्होत्रा देखील उपस्थित होता. मनीष मल्होत्राच्या घराजवळ कियारा आणि सिद्धार्थ दिसल्यापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना वाऱ्याचे वेगाने पसरू लागल्या.

कियारा आणि सिद्धार्थच्या प्रेम कहाणीविषयी बोलायचे झाले तर, कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन बत्राच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' या बायोपिकमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात ऑन-स्क्रीन रोमान्स करताना, ऑफ-स्क्रीन या दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघेही पार्ट्यांपासून सुट्टीपर्यंत अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले. या दोघांनाही जोडी लोकांना खूप आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT