Brahmastra 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra 2: देवाचे पात्र कोण साकारणार? 'हा' दाक्षिणात्य कलाकार साकारणार मुख्य भूमिका

ब्रह्मास्त्र 2 ही आधुनिक काळातील पौराणिक कथांची आणखी एक भव्य अभिव्यक्ती आहे आणि यशला देवचे शक्तिशाली पात्र साकारण्याची ऑफर देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' (Brahmastra) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आधी पासूनच निर्माण केला आहे. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये देवची भूमिका कोण करणार? रणवीर सिंगला या भूमिकेसाठी घेणार असल्याचे बोलले जात आहे. एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की KGF स्टार यशला 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये देवची भूमिका करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “ब्रह्मास्त्र 2 ही आधुनिक काळातील पौराणिक कथांची आणखी एक भव्य अभिव्यक्ती आहे आणि यशला देवचे शक्तिशाली पात्र साकारण्याची ऑफर देण्यात आली आहे. इतर प्रत्येक प्रकल्पाप्रमाणे, हा चित्रपट देखील KGF स्टार्सच्या यादीत आहे.

अशी आशा आहे की ते जानेवारी 2023 पर्यंत म्हणजे त्याच्या वाढदिवसापर्यंत त्याची मनधरणी करतील.'यशची हिंदी चित्रपटातील लोकप्रियता लक्षात घेत KGF चित्रपटाच्या अभूतपुर्व यशानंतर, कन्नड अभिनेत्याने 'ब्रह्मास्त्र 2' चा भाग निर्मित करण्याचा जर निर्णय घेतल्यास त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला असा दावा करण्यात आला होता की, रणवीर सिंग ब्रम्हास्त्रच्या आगामी भागात भूमिका साकारणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या काळातच चित्रपटाच्या पुढील भागाची चर्चा रंगली होती. आयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात हृतिक रोशन देवची भूमिका साकारू शकतो अशी अफवा उठली होती. हृतिकने सर्व बातम्यांचे खंडन करत त्या फक्त अफवा असल्याचे सांगितले.

आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवाची भूमिका कोण साकारणार? काय आहे रणबीर कपूरचे वडील देव यांची कहाणी? देवसाठी ‘ब्रह्मास्त्र’ का आवश्यक आहे? देव आणि अमृता का वेगळे झाले? दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार की आणखी कोणी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘ब्रह्मास्त्र २’ मध्येच पाहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT