Arjun Kapoor Cryptic Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor Cryptic Post : "नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच...", ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Arjun Kapoor And Malaika Arora Breakup Rumours : गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

सोशल मीडियावर पुन्हा एकदा बॉलिवूडचं फेमस कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा होत आहे. गेल्या ७ वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा होत आहे. २६ जूनला अर्जुन कपूरचा ३९ वा वाढदिवस होता. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पण मलायकाने उपस्थिती लावलेली नाही. अशातच अर्जुनने ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.

अनेकदा सोशल मीडियावर अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगलेल्या आहेत. अशातच या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने एक क्रिप्टिक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, "नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच स्वत:ला कोणत्याही गोष्टीची शिस्त लावून घ्या..." अशी क्रिप्टिक पोस्ट त्याने शेअर केलेली आहे.

Arjun Kapoor Cryptic Post

मलायका आणि अर्जुनचे मार्ग वेगळे असून ते आता एकमेकांना डेट करणार नाहीत, अशी ही चर्चा आहे. एकीकडे मलायकाच्या मॅनेजरने या चर्चा फेटाळल्या आहेत. तर दुसरीकडे अर्जुन आणि मलायका मात्र इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अर्जुन कपूरनंतर आता मलायकानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या नात्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं समजतंय.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. अरबाज खानकडून घटस्फोट घेतल्यानंतर २०१८ मध्ये मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये आले. २०१८ मध्ये, मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. दोघांमध्येही तब्बल १३ वर्षांचं अंतर आहे. अनेकदा दोघांनाही वयावरून तुफान ट्रोलही करण्यात आलं होतं. कितीही ट्रोल झाले तरीही अनेकदा हे कपल एकत्रित स्पॉट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT