Ananya Panday Love Status 
मनोरंजन बातम्या

Ananya Panday: ऐकलं का! अनन्या पांडे परदेशातल्या मॉडलच्या प्रेमात पडलीये म्हणे; खास पोस्टने सत्य आलं समोर

Ananya Panday Love Status: अनन्या पांडेचा आज जन्मदिवस आहे. खास दिवशी तिला एका खास व्यक्तीकडून स्पेशल मेसेज आलाय. त्यामुळे अनन्या परत प्रेमात पडलीय अशी चर्चा सुरू झालीय.

Bharat Jadhav

अनन्या पांडे नेहमीच आपल्या रिलेशनशीप आणि लिंकअपच्या वृत्तामुळे चर्चेत असते. कॉफी विथ करण या शोच्या मागील हंगामात बोलाताना तिने आदित्य रॉय कपूरबाबत असलेल्या नात्याची कबुली दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यात आता अनन्याच्या वाढदिवशी एका खास मेसेजने नव्या प्रेम कहाणीला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झालीय. कोण आहे अनन्याचा नवा ब्रॉयफ्रेंड ते जाणून घेऊ.

अनन्या पांडेच्या बॉयफ्रेंडने आज तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती इंस्टावर शेअर केलीय. अनन्याचा बॉयफ्रेंड वोल्कर ब्लॅनकोने अनन्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केलीय. 'हॅपी बर्थडे ब्यूटीफुल. तू खूप खास आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ऍनी. तसेच बॉयफ्रेंड वॉल्कर ब्लॅनकोने आपल्या आपल्या अकाउंटवर इंस्टा स्टोरीज पोस्ट केलीय. यात अनन्याचा फोटो टाकलाय. यात अनन्याने ब्लू टॉप घातलाय. ती या फोटोमध्ये खूप सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिच्या बॉयफ्रेंडने त्यांच्या नात्याची पृष्टी केल्याने अनन्या पांडे खूप आनंदी झालेली दिसत आहे.

वृत्तानुसार, अनन्या पांडेचा प्रियकर हा वॉल्कर ब्लॅनको युएसमध्ये राहणारा आहे. त्याने त्याच्या जीवनाचा अधिक काळ मियामी प्लोरिडामध्ये घालवलाय. अनन्या पांडेची आई भावना सध्या 'फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्हज'मध्ये दिसल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी अनन्या पांडेच्या लव्ह लाईफबद्दलही सांगितले. जेव्हा अनन्या तरुण होती, तेव्हा तिचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले होते. पण फरक एवढाच होता की तिने त्याची हेडलाईन कधीच केली नाही.

अनन्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची इच्छा आहे की तिच्या मुलीने तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगावे. भावना पांडे म्हणते की ती तेव्हाच भावूक होईल जेव्हा अनन्या लग्नाचा विचार करेल. तिच्याकडे येईल आणि तिला सांगेल की तिला आता लग्न करायचं आहे. सध्या तिला फक्त मजा करायची आहे.

अनन्याने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात २०१९ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून केली आहे. यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहले नाही. अनन्याने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. अनन्याने 'पती पत्नी और वो' 'ड्रीम गर्ल 2', 'लायगर', 'खाली पीली', 'खो गए हम कहाँ' यां चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT