Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

बाबो... Urvashi Rautela चा वाढदिवसासाठी 'इतका' खर्च, परदेशात केलेला खर्च ऐकूण येईल आकडी

Urvashi Rautela Birthday Spent: उर्वशीचा २५ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या खर्चामुळे बरीच चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या आपल्या अभिनयाने नाही तर, बोल्ड लुकने बरीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा आणि ऋषभ पंथच्या रिलेशनची ही बरीच चर्चा रंगत होती. त्यामुळे ही तिला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत होते. ती कोणत्याही कृतीने हमखास ट्रोल होतेच. आता वेगळ्याच कारणाने उर्वशीकडे सर्वांचं लक्ष वेधले. ते कारण आहे, स्वतःच्या वाढदिवसाला केलेला खर्च.

उर्वशीचा २५ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या खर्चामुळे बरीच चर्चेत आली आहे. उर्वशीने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खर्च केलेली रक्कम ऐकुण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरवर तिने तिचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनसाठी तिने खर्च केलेली रक्कम आता समोर आली आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की त्या पैशात १ घरही येईल.

या फोटोंमध्ये उर्वशी फारच सुंदर दिसते, याशिवाय तिच्या वाढदिवसाला केलेले खास डेकोरेशन पाहून सर्वच अचंबित झाले आहेत. उर्वशीकडे २४ कॅरेट सोन्याचे कपकेक आणि १०० डायमंड्सने जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता आणि संपूर्ण सजावट ही हेलियम फुगे, गुलाबी आणि लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती. या वाढदिवसासाठी तिने एकूण ९३ लाख रुपये खर्च केले आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती राम पोथीनेनीसोबत एका अनटायटल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज आहे. इतकंच नाही तर ही अभिनेत्री हँडसम हंक मिशेल मोरोनसोबत हॉलिवूडमध्ये ही पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT