MC Stan: ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये लावणार हजेरी

‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये लवकरच हजेरी लावणार आहे.
MC Stan In The Kapil Sharma Show
MC Stan In The Kapil Sharma ShowInstagram/ @m___c___stan

MC Stan In The Kapil Sharma Show: ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये लवकरच हजेरी लावणार आहे. बिग बॉसनंतर आता स्टॅन सोनी टीव्हीच्या लोकप्रिय शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

एमसी स्टॅन आणि कपिल शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टेन त्याचे प्रसिद्ध गाणे 'बस्ती का हस्ती' गाताना दिसत आहे. एमसी स्टॅनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

MC Stan In The Kapil Sharma Show
Arbaaz Khan: ‘सलमान शाहरुखपेक्षा भारी...’ असं का म्हणाला भाईजानचा भाऊ अरबाज खान?

‘बिग बॉस १६’ मध्ये येण्यापूर्वीच एमसी स्टॅन त्याच्या रॅपमुळे खूप प्रसिद्ध होता. त्याचे अनेक रॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. चाहते त्याची फॅशन सेन्स नेहमीच करण्याचा प्रयत्न करतात. एमसी स्टॅनने त्याच्या फॅन फॉलोइंगच्या जोरावर ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकली. आता त्याचे चाहते एमसी स्टॅनला कपिल शर्मा शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एमसी स्टॅन लाल रंगाच्या कपड्यांमध्ये फुल रॅपर वाइबमध्ये दिसत आहे. दरम्यान, तो कपिल शर्मासोबत 'बस्ती का हस्ती' हे गाणे गात आहे. कपिल शर्मासोबत शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकही एमसी स्टेनच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

MC Stan In The Kapil Sharma Show
Jayalakshmi Passed Away: दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनंही जगाचा घेतला निरोप; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. आम्ही ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एमसी स्टॅनला पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. म्हणत अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये बरीच वाढ झाली आहे. एमसी स्टेनचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com