Arbaaz Khan And Shah Rukh Khan
Arbaaz Khan And Shah Rukh KhanSaam Tv

Arbaaz Khan News: ‘सलमान शाहरुखपेक्षा भारी...’ असं का म्हणाला भाईजानचा भाऊ अरबाज खान?

अरबाजने शाहरुखच्या होस्टिंगवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुखच्या कामाची तुलना थेट अरबाजने बिग बी अमिताभ बच्चन आणि सलमान खानसोबत केली आहे.

Bollywood News: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आपल्या अभिनयाने नाही तर दिग्दर्शनामुळे बराच चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये अभिनयाकरिता आलेला अरबाज कालांतराने सिनेसृष्टीत दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळाला. अरबाजने चित्रपटांमध्ये फार काही काम केले नाही. नुकतंच ‘बॉलिवूड बबल’ या युट्यूब चॅनलवर अरबाज खानने एक टॉक शो सुरू केला आहे. त्यात त्याने बॉलिवूडच्या किंग खानच्या कामाबद्दल वक्तव्य केले आहे.

Arbaaz Khan And Shah Rukh Khan
Jayalakshmi Passed Away: दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनंही जगाचा घेतला निरोप; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या सूत्रसंचालनावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी अरबाज म्हणतो, " सलमानने 'दस का दम' या कार्यक्रमातून दमदार कमबॅक केलं होतं. अमिताभ बच्चन ही सध्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये होस्टिंग करीत आहे. सध्या या दोघांचंही फिल्मी लाईफ खूप छान सुरू आहे. हीच गोष्ट शाहरुखला त्याच्या फिल्मी करियरमध्ये जमली नाही."

या युट्यूब चॅनलवर झालेल्या मुलाखतीत अरबाजने शाहरुखच्या होस्टिंगवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे बरीच चर्चा होत आहे. शाहरुख खाननेही अनेक टेलिव्हिजन शोमध्ये आणि काही पुरस्कार सोहळ्यांना ही त्याने सूत्रसंचालन केलं आहे. शाहरुखचं सूत्रसंचालन तेवढं नैसर्गिक आणि उत्तम नसल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे.

Arbaaz Khan And Shah Rukh Khan
जबरदस्त ॲक्शन अन् भन्नाट विषय असणाऱ्या 'Citadel'चा टीझर आलाय, Priyanka Chopra च्या लूकने लावले चार चाँद

अरबाज इतक्या वरच थांबला नाही, तो पुढे म्हणतो, "माझ्या अंदाजे शाहरुख खान छोट्या पडद्यावर त्याच्या भूमिकेत निरागसता आणि नैसर्गिकता आणण्यात अपयशी ठरला. लोकांना कामात तो खोटा किंवा बेगडी वाटला. टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही मुखवटे धारण करून राहू शकत नाही. त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारखं तुम्ही चलाख असायला हवं. बच्चनजी हे त्यांच्या प्रेक्षकांना ओळखून होते, शाहरुखला ही गोष्ट नेमकी जमली नाही.” शाहरुखने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अनुपस्थितीत 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com