Urvashi Rautela and Rishabh Pant
Urvashi Rautela and Rishabh Pant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela: काळजी करणं आलं अंगाशी; उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी...

Chetan Bodke

Urvashi Rautela: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला दिल्लीत ३० डिसेंबरला अपघात झाला होता. चाहत्यांना अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियासह सर्वत्रच त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. त्यातच एका व्यक्तीची कमाल चर्चा होती ती म्हणजे, उर्वशी रौतेला.

ऋषभबद्दल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही क्रिकेटपटूचे नाव न घेता त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. आता तिची आई मीरा रौतेलानेही ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने चाहत्यांना ऋषभसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ती बरीच प्रसिद्धी झोतात आली आहे. वास्तविक, मीराची ही सोशल मीडिया पोस्ट पंतच्या चाहत्यांना आवडलेली नाही. तर काही ट्रोलर्सने मीराचा जावई लवकरच बरा होईल असेही कमेंट्सच्या माध्यमातून बोलले आहेत.

उर्वशीच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषभसाठी खास एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत उर्वशीची आई मीरा रौतेला म्हणते, 'एकीकडे सोशल मीडियावर अफवा आणि दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंड राज्याचे नाव उज्ज्वल करायचे आहे. सिद्धबलीबाबाचा तुझ्यावर नेहमीच आशिर्वाद आहे. सर्वांनीच त्याच्यासाठी प्रार्थना करावी. गॉड ब्लेस यु ऋषभ.'

यावेळी उर्वशीच्या आईवरही नेटकरी भलतेच संतापले आहेत. उर्वशीच्या आईच्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत म्हणतात. 'जावई लवकर बरे होतील, टेन्शन घेऊ नका.' अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, 'तुम्ही 'जावई' शब्द लिहायला विसरले का?' तर आणखी एक युजर म्हणतो, 'आता ऋषभ ठीक होईल, सासू-सासऱ्यांनीही प्रार्थना केली आहे.'

उर्वशीच्या आईची पोस्ट काही युजर्सला आवडली आहे तर काहींना ही पोस्ट आवडलेली नाही. आधी लेक आणि आता आईने ही सुरुवात केली, अशा भाषेत नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघींनाही ट्रोल केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT