Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: 'सलमानच्या गाडीवर जाऊन का आदळत नाही?...' धडपडणाऱ्या उर्फीवर नेटकऱ्यांची ट्रोलधाड

बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने चर्चेत असते. तिला नेटकरी नेहमी एवढे ट्रोल करतात तरीही तिला कोणताच फरक पडत नाही.

Chetan Bodke

Urfi Javed Trolled: बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने चर्चेत असते. तिला नेटकरी नेहमी एवढे ट्रोल करतात तरीही तिला कोणताच फरक पडत नाही. तिच्यावर काही दिवसांपूर्वी बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी सडकून टीका केली होती, एवढी टीका करुनही तिच्यावर कुठलाही फरक पडत नाही.

ती नेहमी या ना त्या नव्या अवतारात चाहत्यांसमोर येते. काही दिवासांपूर्वीच उर्फीची सनी लिओनीसोबत तुलना झाल्याने तिला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा उर्फीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर एका युजरने सलमान खानचा उल्लेख करत भन्नाट कमेंट केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत उर्फी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अर्थातच नेहमीप्रमाणे उर्फीचा हा ड्रेस युनिक आणि अतरंगी आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमुळे तिचा वारंवार तोल जात असून ती या व्हिडीओमध्ये ड्रेसमुळे धडपडताना आणि लोकांवर आदळताना दिसत आहे. तिची ही अवस्था पाहून एका नेटकऱ्याला चक्क सलमानची आठवण झाली.

उर्फीच्या या व्हिडिओखाली बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. त्यातील एक नेटकरी म्हणतो, “सगळ्यांवर आदळते मग सलमान खानच्या गाडीवर जाऊन का आदळत नाही तू?” याशिवाय आणखी सोबतच काही नेटकऱ्यांनी, “पुढच्या वेळी चष्मा लावून ये.”, “ही पडली कशी नाही” असाही टोमणा मारला आहे.

सध्या उर्फी एमटीव्हीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'स्प्लिट्सव्हिला'मध्ये सहभागी झाली आहे. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी यांच्या खांद्यावर आहे. या कार्यक्रमात हटक्या कपड्यांमुळे आणि विचित्र पोजमुळे प्रसिद्ध असलेली उर्फी सनी लियोनीवर चांगलीच भारी पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT