Odela 2 First Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Odela 2 First Poster: महाशिवरात्रीच्या दिवशी तमन्ना भाटियाने चाहत्यांना दिलं सरप्राइज, 'ओडेला 2' मधील फर्स्ट लूक आऊट

Priya More

Odela 2 Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) तिच्या आगामी 'ओडेला 2' (Odela 2 Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच महाशिवरात्रीच्या दिवशी तमन्ना भाटियाने आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. तमन्नाने 'ओडेला 2' चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा चित्रपट साऊथचा सुपरहिट चित्रपट 'ओडेला'चा रिमेक आहे. हा चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट म्हणजेच 'ओडेला 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तमन्ना भाटियाने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ओडेला 2'मधील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये तमन्ना शिवभक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. कपाळावर चंदन आणि लाल टिळा, हातात डमरू आणि भगवे कपडे घातलेल्या तमन्नाचा अवतार खूपच जबरदस्त दिसत आहे. अशा लूकमध्ये तमन्ना पहिल्यांदाच दिसली आहे. तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तमन्नाच्या या पोस्टरवर कमेंट्सचा महापूर आला आहे. अभिनेत्रीच्या या लूकचे सर्वजण कौतुक करत आहेत.

'ओडेला 2' चित्रपटातील तमन्नाच्या लूकवरून असे दिसून येते की, अभिनेत्री भगवान शिवाच्या अनुयायाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव 'शिवशक्ती' आहे. तमन्नाने याचित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, '#FirstlookOdela2 महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी पहिला लूक आउट करताना मला आनंद होत आहे. हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा'

मागच्या महिन्यामध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. 'ओडेला 2' चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अशोक तेजा यांनी 'ओडेला 2' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर डी. मधू निर्मित आणि संपत नंदी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'ओडेला २' व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत 'वेद' चित्रपटामध्येही दिसणार आहे. तिच्या किटीमध्ये 'अरनमानाई 4' देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT