Taapsee Pannu On Marriage With Mathias Boe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu On Marriage With Mathias Boe: “खासगी आयुष्यात मला लोकांना…”, तापसी पन्नूने लग्नाबद्दल मौन सोडलं

Taapsee Pannu Interview: तापसी आणि मॅथियासने नेमकं लग्न केलं आहे, की नाही? याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच तापसीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Taapsee Pannu On Marriage With Mathias Boe

मार्च महिन्यामध्ये, अभिनेत्री तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत लग्न केल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नातले काही व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तापसी आणि मॅथियासने दोघांनीही इन्स्टाग्रामवर लग्नातले फोटो शेअरही केलेले नाहीत. त्यामुळे या कपलने लग्न केलं आहे, की नाही? याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच तापसीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. नेमकं तिने गुपचूप का लग्न का केलं ? याबद्दल तिने भाष्य केलं आहे. (Bollywood Actress)

तापसी पन्नूने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल म्हणाली की, “माझ्या खासगी आयुष्याबाबत मला लोकांना सांगायचे नव्हते. माझ्या लाईफ पार्टनरने किंवा लग्नाला आलेल्या लोकांनी माझे आयुष्य निवडलेले नाही. जर मी माझ्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तर मला कसे वाटेल हे माहित नव्हते. म्हणूनच मी ते गुप्त ठेवले.” सोबतच सध्या अभिनेत्रीचा लग्नाचे फोटो शेअर करण्याबाबत कोणताही विचार नाही. यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नाही. भविष्यात मला वाटले तर मी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करेल. (Bollywood News)

लग्नातील जबाबदाऱ्या कोणी पार पाडल्या व तयारी कोणी केली याबाबत तापसीने सांगितलं, “लग्नातील सर्व जबाबदाऱ्या माझी बहीण शगुन पन्नूने सांभाळले. माझ्या लग्नाचे सर्व नियोजन मी तिच्यावर सोपवले होते. माझ्या लग्नात खूप कमी लोक होते, त्यामुळे मला फार काळजी नव्हती,” असं तापसीने सांगितलं. तापसी आणि मॅथियास गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात. (Social Media)

तापसीने एका मुलाखतीमध्ये मॅथियासबद्दल मोकळेपणाने सांगितले होते की, ती तिच्या पहिला बॉलिवूड चित्रपट 'चश्मे बद्दूर'च्या शूटिंगच्या वेळी मॅथियासला भेटली होती. तापसी पन्नूचा होणारा नवा मॅथियास हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. २०१५ च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

Maratha Reservation: मुंबईत आंदोलनांवर बंदी घालावी; मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune : गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण-प्रसारणास मनाई! पुणे प्रशासनाचे आदेश, पालन न केल्यास होणार शिक्षा

Maharashtra Live News Update: हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

SCROLL FOR NEXT