मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडालाय... इराण आणि इस्रायल एकमेकांसमोर उभे ठाकलेत. पण या युद्धाच्या आगीत आता जगाचं लक्ष असलेल्या 'दुबई'बाबत एक धक्कादायक दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'वर हल्ला झालाय का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य? पाहुया आमचा विशेष रिपोर्ट... वायरल सत्य!
सोशल मीडियावर सध्या एका बातमीनं खळबळ माजवून दिलीय. दावा केला जातोय की, इराणनं आता दुबईला लक्ष्य केलंय. बुर्ज खलीफाच्या परिसरात मिसाईल्स पडल्याचं बोललं जातंय. दुबई मरीन परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली असून बुर्ज खलीफा रिकामी केली जात असल्याच्या पोस्ट्स इंटरनेटवर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.
इराणनं दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
बुर्ज खलिफावर हल्ला झाला असून इमारत रिकामी केली जात आहे.
दुबईच्या आकाशात क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून तिथे मोठा गोंधळ माजलाय.
सोशल मीडियावर हे दावे वेगाने पसरल्यानंतर 'साम टीव्ही'च्या टीमनं या प्रकरणाची पडताळणी सुरू केली. आम्ही दुबईतील स्थानिक प्रशासन आणि तिथल्या अधिकृत वृत्तसंस्थांच्या बातम्या तपासल्या. तेव्हा जे सत्य समोर आलं, ते थक्क करणारं होतं.
दुबई प्रशासनानं स्पष्ट केलंय की बुर्ज खलिफावर दुबईत कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. बुर्ज खलिफा सुरक्षित आहे आणि तिथे कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ हे एकतर जुन्या घटनांचे आहेत किंवा चुकीच्या संदर्भाने जोडले गेले आहेत.
आमच्या पडताळणीत दुबईवर हल्ला झाल्याचा दावा 'पूर्णपणे खोटा' ठरलाय़.
((एअरपोर्टवरील गर्दी, डायवर्ट झालेली विमाने, इराणच्या मिसाईल हल्ल्याचे दृश्य))
धूर निघतोय म्हणजे आग कुठेतरी नक्कीच लागली आहे. कारण इराणनं शेजारील राष्ट्रांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवलाय. यात दुबईचाही समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणंही रद्द केली आहेत किंवा मार्ग बदलले आहेत. मात्र दुबई सध्या तरी सुरक्षित आहे. मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहे हे खरं असलं, तरी दुबईच्या बुर्ज खलीफावर हल्ला झाल्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. 'साम टीव्ही'च्या पडताळणीत बुर्ज खलीफावरील हल्ल्याचा दावा 'असत्य' ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.