Taapsee Pannu FIR News: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले होते. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.
इंदूरमध्ये, हिंदू रक्षक संघटनेने चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नूवर अश्लीलता पसरवल्याचा आणि हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे निमंत्रक एकलव्य गौरने छत्रीपुरा पोलिस ठाण्यात तापसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हिंदू रक्षक या संघटनेने याप्रकरणी अभिनेत्री तापसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असे तक्रारीत लिहिले आहे. या निवेदनानंनतर तापसी विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी हिंद रक्षक संयोजक एकलव्यनं केली आहे. आणि जर असं झालं नाही तर आम्ही हजारो तरुण रस्त्यावर उतरून यासंदर्भात विरोध प्रदर्शन करू अशी धमकी देखील पोलिसांना दिली आहे.
गौरने फोटोचे स्क्रीन शॉट्स पोलिस अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून पाठवले, ज्यात तापसीने बोल्ड ड्रेसमध्ये हार घातलेला आहे. आता या निवेदनानंतर पोलिस तापसीवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यावर म्हटलं आहे की, ''आम्हाला निवेदन मिळालं आहे आणि या पूर्ण प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ आम्ही मागवून घेतले आहेत,जे तपासले जातील त्यानंतर कारवाई बाबत विचार केला जाईल''.
नक्की प्रकरण काय आहे?
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले आहे. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.
अभिनेत्रीने जाणूनबुजून हिंदू समाजाचा अपमान केल्याचे गौर यांचे मत आहे. तापसी पन्नूच्या विरोधात बीजेपी नेत्याच्या मुलानं इंदौर येथील छतरीपुरा पोलिस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलं आहे. हिंदू रक्ष संघटनेचा संयोजक असलेल्या एकलव्य गौरने छतरीपुरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात कारवाई करण्या संदर्भात हे निवेदन दिलं आहे.
या निवेदनात लिहिलं की, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिनं खूप बोल्ड कपडे घातले होते. त्यावर आराध्य देवी लक्ष्मीमातेचं लॉकेट गळ्यात घातलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.