Swara Bhaskar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar : स्वरा भास्करचं एक्स अकाऊंट कायमचे बंद, नेमकं कारण काय? अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी

Swara Bhaskar X Account Permanently Suspend : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. यावर आपली नाराजी व्यक्त करत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. नेमकं पोस्टमध्ये काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती स्पष्टवक्ता म्हणून ओळखली जाते. सध्या स्वरा भास्कर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. हा बातमी अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या स्वरा भास्करची चर्चा रंगली आहे.

नेमकं कारण काय?

अभिनेत्री स्वरा भास्करने दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी आणि 30 जानेवारीला केलेल्या पोस्टमुळे स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. तिने शेअर केलेल्या महात्मा गांधींचा फोटो आणि तिरंग्यासोबत मुलीचा फोटो यावर कॉपीराईट लावण्यात आले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला असल्यामुळे स्वराचे एक्स अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

स्वरा भास्करने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एकंदर असे म्हटले आहे की, मला दोन फोटोंना कॉपीराईट उल्लंघन केल्याचे आले होते. त्यानंतर एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. स्वराने एक पोस्ट 26 जानेवारीला तर दुसरी पोस्ट 30 जानेवारीला केली होती. स्वराने 26 जानेवारीला हातात तिरंगा घेतलेल्या आपल्या मुलाचा आणि 30 जानेवारीला "गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल अभी जिंदा हैं" अशा टेक्स्टची पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्टवर कॉपीराईट आला आहे.

एक्सने थेट अकाऊंट बंद केल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करने नाराजी व्यक्त केली आहे. तिने लिहिलं आहे की, गांधीजींच्या पोस्टमध्ये जो नारा लिहिला आहे तो प्रगतीशील आंदोलनाचा आहे. यात कॉपीराईटच्या उल्लंघन कसे झाले? तसेच दुसरा फोटो माझ्या स्वतःच्या मुलाचा असून मी चेहरा देखील लपवला आहे. माझ्या मुलीच्या फोटोवर कोणाचा कॉपीराइट आहे? असे प्रश्न तिने केले आहेत.

स्वरा भास्करने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक्स अकाऊंटवर केलेल्या दोन्ही पोस्टचे स्क्रीनशॉट देखील टाकले आहेत. शेवटी स्वराने पोस्टमध्ये म्हटले की, "या ट्विटना मास रिपोर्ट करण्यात आले आहे. मला त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा उद्देश आहे. एक्सने कृपया याची नोंद घ्यावी आणि आपला निर्णय बदलावा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT