Aarya Season 3 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aarya Season 3 Teaser: 'जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है', सुष्मिता सेनच्या 'आर्या-3'चा धडाकेबाज टीझर पाहिलात का?

Arya Web Series Season 3: सुष्मिता सेनची लोकप्रिय वेबसीरिज 'आर्या'च्या (Aarya) तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priya More

Actress Sushmita Sen:

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) काही महिन्यांपूर्वी 'ताली' (Tali Webseries)) या वेबसीरिजमुळे चर्चेत होती. तिने या वेबसीरिजमध्ये तृतीयपंथी गौरी सावंतची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील सुष्मिताच्या दमदार अभिनयाचे खूपच कौतुक झाले. 'ताली'चा कडकडाट अजून कमी झाला नाही तोवरच सुष्मिता सेन आणखी एका दमदार व्यक्तिरेखेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुष्मिता सेनची लोकप्रिय वेबसीरिज 'आर्या'च्या (Aarya) तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या वेबसीरिजचा टीझर नुकताच रिलीज झाला. अंगावर शहारे आणणारा 'आर्या ३' च्या टीझरला (Aarya Season 3 Teaser) सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहेत. टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'आर्या' वेबसीरिजचा सीझन १ आणि सीझन २ ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही सीझननंतर प्रेक्षक तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. दोन्ही सीझनच्या यशानंतर आता आर्याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन मागच्या दोन सीझनपेक्षा एक लेव्हल जबरदस्त असणार असल्याचे दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे नुकताच आर्या ३ चा टीझर रिलीज झाला.

३० सेकंदाच्या या टीझरमध्ये सुष्मिता सेन बेधडकपणे सिगार ओढताना आणि हातात पिस्तूल धरताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही वेबसीरिज ३ नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज झाली आहे. आर्या ३ चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. सर्वजण वेबसीरिज रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, सुष्मिता सेनसाठी 'आर्या' ही वेब सीरिज खूप खास आहे. कारण जून २०२० मध्ये अभिनेत्रीने या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. या वेबसीरिजच्या माध्यमातून सुष्मिताने ओटीटीवर वर्चस्व गाजवले. या वेबसीरिजमध्ये ती एका सशक्त स्त्रीच्या भूमिकेत दिसत आहे. जी प्रत्येक संकटातून आपल्या कुटुंबाचे रक्षण करते. अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर यानेही या वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT