Upcoming Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Web Series: ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री...

ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्टच्या जीवनावर आधारित वेबसीरीज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सुष्मिता सेनची 'आर्या' ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेबसीरीजचे आत्तापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. सुष्मिता सेन आणखी एका वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. तिची ही आगामी वेबसीरीज ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्ट गौरी सावंतवर आधारित आहे. या वेबसीरीजमध्ये सुष्मिता गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे.

पीपिंगमूनच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी ट्रान्स अॅक्टिविस्ट गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेबसीरीजमधील भूमिकेसाठी सुष्मिताला विचारले होते. ही भूमिका साकारण्यासाठी ती तयार आहे. सुष्मिताला वेबसीरीजची स्क्रिप्ट आवडली असून, ही भूमिका करण्यासाठी सुष्मिता खूप उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला तिच्या आर्या या व्यक्तिरेखेतून बाहेर पडून काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिला गौरीचे पात्र खूप आवडले आहे.

या वेबसीरीजवर काम सुरू झाले आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. ही वेबसीरीज वूट सिलेक्टवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट आणि मीडिया सोल्युशन्सच्या बॅनरखाली अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर या वेबसीरीजची निर्मिती करणार आहेत. या सीरीजमध्ये सहा एपिसोड असणार आहेत. या वेबसीरीजच्या माध्यमातून गौरी सावंत यांच्या जीवनातील पैलू उलगडणार आहेत.

या वेबसीरीजचे टायटल अजून निश्चित झालेले नाही. टायटल निश्चित झाल्यावर निर्माते इतर कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या वेबसीरीजची चित्रीकरण पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT