Surveen Chawla Saam Tv
मनोरंजन बातम्या

Surveen Chawla: त्याने मला बोलावलं, पँट खोलली अन् हस्तमैथुन करू लागला...; अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव

Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने शाळेत असताना तिच्यासोबत घडलेल्या एका भयंकर घटनेचा अनुभव सांगितला. त्या घटनेमुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने हे सांगितलं.

Priya More

अभिनेत्री सुरवीन चावला तिची नुकताच प्रदर्शित झालेली वेबसीरिज 'क्रिमिनल जस्टिस ४'मुळे चांगलीच चर्चेत आहे. सुरवीनच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. सध्या सुरवीन या वेबसीरिजचे प्रमोशन करण्यामध्ये खूपच व्यस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्यासोबत घडलेल्या एक भयंकर आणि वेदनादायक अनुभव शेअर केला जे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुरवीनने शाळेत असताना तिच्यासोबत ही भयंकर घटना घडली होती. या घटनेची भीती आजही तिच्या मनात आहे.

सुरवीनने सांगितले की, 'जेव्हा मी नववीत होती तेव्हा माझ्यासोबत एक खूपच भयानक घटना घडली होती. मी बाहेर खेळायला गेले होतो तेव्हा एक माणूस सायकलवरून तिथे आला. मला ते चांगलं आठवतंय. त्याने मला त्याच्याकडे बोलावलं. मी त्याच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा मला दिसलं की तो त्याच्या पँटमधून काहीतरी बाहेर काढत होता आणि मग तो सायकलवर बसून हस्तमैथुन करू लागला. मी यू-टर्न घेतला आणि घराकडे पळत गेले.'

या भयंकर अनुभवाबद्दल सांगताना सुरवीन पुढे म्हणाली की, 'त्यावेळी तो काय करत आहे ते मला समजलं नाही पण मला काहीतरी विचित्र वाटलं. म्हणून मी त्याच्याकडे गेले नाही. या घटनेने मला आतून हादरवून टाकले अशा घटनांमुळे मलींच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण होतो. त्यांना त्यावेळी समजत नाही की काय चालले आहे. पण ती गोष्ट त्यांच्या मनात घर करून जाते आणि त्याचा परिणाम बराच काळ राहतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT