New Year Celebration Saam Tv
मनोरंजन बातम्या

New Year Celebration: बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं नववर्षाचं दणक्यात स्वागत, काहींनी परदेशात तर काहींनी मायदेशी येत केले सेलिब्रेशन...

काल देशासह जगभरातील सर्व नागरिकांनी २०२२ या सरत्या वर्षाला अलविदा करत २०२३ या वर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले.

Chetan Bodke

New Year Celebration: काल देशासह जगभरातील सर्व नागरिकांनी २०२२ या सरत्या वर्षाला अलविदा करत २०२३ या वर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. कलाकार मंडळींनी ही आपल्या बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत देशासह- परदेशात जात सुट्टीचा आनंद लुटला.

Suhana Khan Photos

शाहरुख खान आणि गौरी खान, मुलगी सुहाना खान, करीना कपूर खानसह इतर स्टार्सनीही नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले. काही कलाकारांनी आपला नवा वर्षाचा संकल्पही चाहत्यांसोबत शेअर केला.

सुहानाने ३१ डिसेंबरच्या सायंकाळी सुर्यास्ताचा फोटो शेअर करत सरत्या वर्षाला अलविदा करत नव्या वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत केले. यावेळी तिच्यासोबत भाऊ अबरामदेखील होता. फोटोमध्ये, दोन्ही स्टार किड्सने बीचवर धम्माल मस्ती करत नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले.

तर दुसरीकडे करीना कपूर खाननेही परदेशात आपल्या परिवारासह नवीन वर्षाचे स्वागत केले. अभिनेत्री सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून तिच्यासोबत पती सैफ अली खान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खानही आहेत.

करीना कपूर खाननेही सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले. तिनेही सुर्यास्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच यावेळी मुलगा तैमूर आणि जहांगीरनेही नववर्षाचे स्वागत केले.

अनुष्का शर्माने देखील गेल्या वर्षातील तिचे काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहमीच अनुष्का तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, पण नववर्षाच्या स्वागतासाठीच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.

शेअर केलेल्या फोटोत अनुष्का कारमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. सर्व तिचे खास फोटो पती विराटने काढले आहेत, हे सांगण्यासाठी अनुष्का विसरली नाही. नववर्षाच्या स्वागतासाठी दोघेही सध्या दुबईत असून नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले.

परदेशात राहून अनेक सेलिब्रिटींनी नवीन वर्षाचे स्वागत केले, तर हृतिक रोशनने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईत परतला आहे. तो विमानतळावर परतल्याचे काही खास व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. हृतिकसोबत विमानतळावर एक्स गर्लफ्रेड सबा आझाद आणि हृतिकचा मुलगाही होता. हे सर्व युरोपमध्ये सुट्टीचा आनंद लुटत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT