New Year 2023 : जानेवारीपासून नाही तर या महिन्यापासून सुरु झाला नवीन वर्षाचा पहिला महिना, जाणून घ्या रंजक इतिहास

नवीन वर्ष १ जानेवारीपासून सुरू होत आहे. या दिवशी हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात.
New Year 2023
New Year 2023Saam Tv

New Year 2023 : डिसेंबरपासूनच लोक नवीन वर्षाच्या तयारीला लागतात, बरेच लोक न्यू इअर पार्टीची योजना आखतात, तर काही लोक नवीन वर्षाच्या निमित्त फिरायला जातात. नवीन वर्ष १ जानेवारीपासून सुरू होत आहे. या दिवशी हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का की अनेक वर्षांपूर्वी नवीन वर्ष 1 जानेवारीला नव्हे तर वर्षातील इतर कोणत्याही महिन्यापासून सुरू होत असे. काही वर्षांपूर्वी रोमन कॅलेंडरमध्ये बदल झाला होता, त्यानंतर 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे केले जाऊ लागले. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अजूनही याची माहिती नसेल, तर जाणून घ्या नवीन वर्षाशी संबंधित हा रंजक इतिहास.

New Year 2023
Happy New Year 2023 : तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून !

1. नवीन वर्षाची सुरुवात मार्च महिन्यापासून व्हायची

नवीन वर्ष नेहमी 1 जानेवारीला सुरू होत नाही. 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करणे 15 ऑक्टोबर 1582 पासून सुरू झाले. पूर्वी नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरू होत असे. रोमचा राजा नुमा पॉम्पिलस याने रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल केले आणि कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्याचा समावेश केला.

जानेवारी महिना हा वर्षाचा पहिला महिना मानला जात असे. पूर्वी कॅलेंडरमध्ये मार्चपासून डिसेंबरपर्यंत फक्त 10 महिने असायचे. म्हणूनच त्या वेळी वर्षात केवळ 310 दिवसांचा विचार केला जात असे.

Happy New year 2023
Happy New year 2023Canva

यांनी १ जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात केली

जाणकारांच्या मते, रोमन शासक ज्युलियस सीझरने १ जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात केली. असे म्हणतात की, ज्युलियस सीझर जेव्हा खगोलशास्त्रज्ञांना भेटला तेव्हा त्याला समजले की, पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवस आणि सहा तासांत फिरते. हे लक्षात घेऊन वर्षातील 310 दिवसांऐवजी 365 दिवस करण्यात आले.

काही वर्षांनी म्हणजे १५८२ मध्ये पोप ग्रेगरी यांना ज्युलियन कॅलेंडरमध्ये लीप वर्षाच्या संदर्भात थोडी चूक आढळली. तेव्हा प्रसिद्ध धर्मगुरू संत बेडे यांनी सांगितले की, संपूर्ण वर्ष हे ३६५ दिवस ६ तासांचे नसून ३६५ दिवस ५ तास ४६ सेकंदांचे असते. त्यानंतर रोमन कॅलेंडर बदलून नवीन कॅलेंडर तयार करण्यात आले. तेव्हापासून 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com