Shah Rukh Khan New Year: ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर शाहरुख खानची धमाकेदार एन्ट्री, कसं असेल त्याचं २०२३ वर्ष?

शाहरुखचा शेवटचा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर चाहत्यांना ब्लॉकबस्टर अपेक्षा.
Shah Rukh Khan New Year
Shah Rukh Khan New Year Saam Tv

Shahrukh Khan's Movie in 2023: बॉलिवूडचा किंग खानसाठी २०२३ हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. शाहरुख खान ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुखचा 'झीरो' चित्रपट २०१८ झाली प्रदर्शित झाला होता. त्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट थेट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहेत. शाहरुख शेवटचा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यामुळे आता २०२३मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट त्याच्यासाठी खास असणार आहेत.

2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप खास असणार आहे. शाहरुखचा चित्रपट ४ वर्षांनी प्रदर्शित होणार आहे. 'पठान' या त्याचा आगामी चित्रपटाची सध्या चर्चा आहे. चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रचंड विरोधानंतर सेन्सॉर बोर्डानेही निर्णय घेतला आहे की चित्रपटातील काही दृश्यांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे आणि ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. 2023 मध्ये या चित्रपटाबाबतचा वाद वाढतो की संपतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Shah Rukh Khan)

Shah Rukh Khan New Year
OTT Movies: नवीन वर्षाची करा फिल्मी सुरूवात, पहिल्या विकेंडला घ्या या चित्रपटांचा आनंद

'पठान' चित्रपट खास असण्याचे आणखी एक कारण आहे. अनेक दिवसांपासून शाहरुख खानचे चाहते त्याच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची वाट पाहत आहेत. बॉलिवूड चित्रपटांचे यश हे बॉक्स ऑफिसवरील त्या चित्रपटाच्या कमाईवर अवलंबून असते. अशा स्थितीत प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Bollywood)

'पठान' चित्रपटाव्यतिरिक्त शाहरुख खान आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत येणार आहे. त्याचा 'जवान' हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटावर काम सुरू आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे साऊथचे दिग्दर्शक अॅटली यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यात शाहरुखशिवाय साऊथची सुंदर अभिनेत्री नयनताराही दिसणार आहे. तसेच सान्या मल्होत्रा ​​आणि विजय सेतुपती देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी महत्त्वाचे असण्याचे कारण या वर्षी त्याचे 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो,अशी चर्चा आहे. परंतु प्रदर्शनाची तारीख स्पष्ट होईपर्यंत काहीही सांगता येत नाही. हा चित्रपट प्रदर्शित होतो की नाही, याची चर्चा 2023 नक्कीच होईल. कारण शाहरुख खानचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आणि त्याचा गाजावाजा होणार नाही, असं होऊ शकत नाही.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. 1960 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द आर्चीज' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. जोया अख्तर दिगदर्शित या चित्रपटामध्ये अनेक स्टार किड्स दिसणार आहेत. चाहत्यांच्या नजरा नेहमीच सुहानावर खिळलेल्या असतात. सुहानाने थिएटर केले आहे आणि ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे मानले जाते. अशा वेळी ती आपल्या अभिनयाने समीक्षकांना प्रभावित करू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com