OTT Movies: नवीन वर्षाची करा फिल्मी सुरूवात, पहिल्या विकेंडला घ्या या चित्रपटांचा आनंद

ओटीटीवरील या चित्रपटांनी करा तुमच्या नव्या वर्षाची सुरूवात.
OTT Movies List
OTT Movies List Saam Tv

OTT Movies For New Year Weekend: २०२२चा शेवट आणि २०२३ सुरूवातच विकेंडने होत आहे. अनेकांचे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी प्लॅन ठरले आहेत. पण असेही काहीजण आहेत जे घरी राहून एकटे किंवा कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करणार आहेत. तर घरी राहून तुम्ही नवीन वर्ष कसे साजरे कराल हे आम्ही तुम्हाला सांगतो. यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील अनेक चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित झाले आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला हे चित्रपट आजपर्यंत बघता आले नसतील तर या विकेंडला नक्की पाहा.

OTT Movies List
Hrithik Roshan: विक्रम वेधानंतर हृतिकचा उत्तम निर्णय, म्हणाला 'चित्रपट सिलेक्शनवर करणार पुनर्विचार...'

नेटफ्लिक्स

जान्हवी कपूरचा 'मिली' शुक्रवारपासून ओटीटीवर पाहता येणार आहे. हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी तिच्या जीवनासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. नवीन वर्षाच्या विकेंडला हा एक चांगला पर्याय असू शकतो. (Netflix)

तसेच नेटफ्लिक्सवर परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांचे 'कोड नेम तिरंगा' सुद्धा उपलब्ध आहे. हर्षवर्धन राणे आणि सोनिया राठी यांचा 'तारा व्हर्सेस बिलाल' हा चित्रपटही या वीकेंडला पाहता येऊ शकतो.

अमिताभ बच्चन, रश्मिका मंदान्ना आणि नीना गुप्ता यांचा 'गुडबाय' हा चित्रपटही ओटीटी आला आहे. विकास बहल दिग्दर्शित हा कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग यांचा डॉक्टर जी हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. वीकेंडला हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडिओ

अजय देवगणचा 'दृश्यम 2' प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. परंतु या चित्रपटासाठी तुम्हाला त्यांकडे रेंट भरावे लागणार आहे. 'दृष्यम 2' हा त्याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे आणि चित्रपटगृहांमध्येही तो चांगला गाजला आहे. (Amazon Prime)

टॉम क्रूझचा 'टॉप गन मॅव्हरिक' प्राइम व्हिडिओवर आला आहे. हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. हा चित्रपट इंग्रजी तसेच हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांचा 'राम सेतू' चित्रपट प्राइम व्हिडिओवर विनामूल्य पाहायला मिळत आहे.

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' देखील विनामूल्य पाहायला मिळत आहे.

'रॉकेट गँग' शुक्रवारी (३० डिसेंबर) उपलब्ध झाला. हा हॉरर कॉमेडी असलेला डान्सवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरिओग्राफर बॉस्को यांनी केले आहे. रॉकेट गँगमध्ये आदित्य सील आणि निकिता दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झी5

तापसी पन्नूचा 'ब्लर' ZEE5 वर आला होता. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नवीन वर्षाच्या वीकेंडला तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. तापसीने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com