Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi And Zaheer Wedding: 'ही अनोखी गाठ बांधली...'; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर पद्धतीने केलं लग्न

Photo of Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding: सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याच्या नवी इनिंगला सुरू केली.

Chetan Bodke

सोनाक्षी सिन्हाने अखेर आज तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले आहे. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आज दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याच्या नवी इनिंगला सुरू केली. शुक्रवारपासूनच सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी मेहेंदी सिरेमनी झाली आणि शनिवारी त्यांच्या घरी रामायणाची विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. आज अखेर सोनाक्षी आणि झहीरचे लग्न झाले. त्यांचा विवाह हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला नसून त्यांनी रजिस्टर मॅरेज केले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनाक्षी आणि झहीरने आज (२३ जून) मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलेले आहे. सोनाक्षीने तिच्या आई- वडिलांना झहीर विषयी सांगितलं नसल्यामुळे ते तिच्यावर नाराज होते. ते तिच्या लग्नाला उपस्थिती लावणार नव्हते. पण ते रिसेप्शनला उपस्थिती लावणार अशी माहिती मिळाली होती. यावेळी लग्नाला सोनाक्षी आणि झहीरचे आई- वडील उपस्थित होते. रजिस्टर पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्यांनी आई- वडिलांचा शुभ आशीर्वाद घेत भावी आयुष्याचा श्री-गणेशा सुरू केला. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये, सोनाक्षी आणि झहीर दोघेही सही करताना दिसत आहेत. लग्नामध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसून येत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करताना सोनाक्षीने कॅप्शन दिले की, "आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम जपण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये विशेष मार्गदर्शन केलं आहे. त्याच प्रेमाने आम्हाला या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही पती आणि पत्नी झालो आहोत. आजपासून आमच्या दोघांसोबत प्रेम आणि आशा आहेत. आतापासून आम्ही कायमचे एकमेकांचे साथी झालो आहोत." सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

लूकविषयी बोलायचे तर, लग्नामध्ये सोनाक्षीने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती. तर झहीरनेही सोनाक्षीच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होईल अशा कपड्यांची निवड केली आहे. यावेळी सोनाक्षीने साडीला फरफेक्ट मॅच होईल असा न्यूड मेकअप केला होता. ग्लॉसी मेकअपमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात डायमंड नेकलेस आणि कानात झुमके असा साज सोनाक्षीने आपल्या लग्नात केला होता.

गेल्या ७ वर्षांपासून सोनाक्षी आणि झहीर रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा हे कपल कॅमेऱ्यासमोर एकत्र स्पॉट झालेलं आहे. पण त्यांनी केव्हाच आपलं नातं लपवलं नाही. सोनाक्षीमध्ये आणि झहीर इक्बालमध्ये एक वर्षांचा फरक आहे. सोनाक्षीहून झहीर एक वर्षाने लहान आहे. दोघांनीही डबल XL चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमान खाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'नोटबूक' चित्रपटातून झहीरने पदार्पण केलं होतं. पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. झहीरचे वडील सराफ व्यापारी आहेत, त्यामुळे त्यांची आणि भाईजानची ओळख फार जुनी आहे. सलमान खानमुळे सोनाक्षी आणि झहीरची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि आता त्या प्रेमाचं रुपांतर लग्नात झाले असून त्यांनी आजपासून आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT