Shraddha Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील मिस्ट्री बॉय कोण? पाहा VIDEO

Shraddha Kapoor Mobile Wallpaper : बॉलिवूडची सुपरस्टार श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात श्रद्धाच्या मोबाईल वॉलपेपरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'स्त्री' आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावते. श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलिकडेच तिला 'स्त्री 2' चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली आहे.तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशात आता अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनेक काळ श्रद्धा कपूर लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. कारण ही दोघे अनेकदा एकत्र दिसली होती. अशात आता श्रद्धाचा मोबाईल वॉलपेपरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामुळे ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या रिलेशनशिपवर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. फोटोमध्ये दिसणारा नक्की मिस्ट्री बॉय कोण? हे जाणून घेण्यास चाहते आतुर आहे.

श्रद्धा कपूर पुन्हा प्रेमात पडली असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. जिम बॅगसोबत श्रद्धाला पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात स्पॉट केले. तेव्हा ती गुलाबी जॅकेट आणि निळ्या लेगिंग्सवर दिसली. तेव्हा आपल्या कारमध्ये बसताना श्रद्धाच्या मोबाईलचा वॉलपेपर कॅमेरात कैद झाला. तिच्या मोबाईल स्क्रीनची एक झलक पाहायला मिळाली. तिच्या वॉलपेपर ती आणि तो मिस्ट्री बॉय एकमेकांच्या बाजूला उभे असलेले पाहायला मिळत आहे.

श्रद्धाच्या व्हायरल मोबाईल वॉलपेपरवर दिसणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून राहुल मोदी (Rahul Mody) असल्याचे सर्वत्र बोले जात आहे. श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाचे पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राहुल मोदीने काम केले आहे. चाहते आता श्रद्धाच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत. श्रद्धाचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Controversy : भारत आणि चीन नरकासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नवा वाद

Viral Video : बाप रे! रिक्षाचं स्टेअरिंग अल्पवयीन मुलाच्या हातात, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; Video व्हायरल

Raja Shivaji Cast Fees: रितेश देशमुख ते संजय दत्त; 'राजा शिवाजी' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ३ तासांसाठी बंद, प्रवाशांनो 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

SCROLL FOR NEXT